भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या या काळात तुर्कीने पाकिस्तानला दिलेलं खुले समर्थन देशभरात जोरदार वादळ निर्माण करत आहे. हा फक्त राजकीय वाद नव्हे, तर आपल्या देशभक्तीची, स्वाभिमानाची परीक्षा आहे. आपल्या वर हल्ले करणाऱ्या शत्रूला मदत करणाऱ्या देशाशी आपण कसे व्यापार करू शकतो? अशा देशाच्या उत्पादनांचा वापर करून आपण कसे त्यांच्या मदतीत हातभार लावू शकतो? हा प्रश्न आज प्रत्येक भारतीयाच्या मनात घुमतोय.
तुर्कीचे पाकिस्तानला लष्करी समर्थन – धोक्याची घंटा
तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेचेप तैय्यप एर्दोगान यांच्या कुटुंबाचा हा विषय अत्यंत संवेदनशील आहे. त्यांच्या कन्या, सुमेय्ये एर्दोगान बायराकतार आणि त्यांचे पती सेलचुक बायराकतार यांच्या नेतृत्वाखालील कंपनीने पाकिस्तानला आधुनिक ड्रोन पुरवले आहेत. विशेष म्हणजे हे बेयराक्तर TB2 आणि यीहा ड्रोन भारताविरुद्ध वापरले गेल्याच्या अनेक बातम्या आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत.
हे ड्रोन मुख्यतः लक्ष्य ठरवण्यासाठी वापरले जातात, तसेच ‘कमिकाझे’ प्रकारच्या हल्ल्यांसाठीही वापरले जात असल्याचे अनुमान आहे. विशेषतः, ते भारतीय सैन्याच्या आगळ्या स्थानकांवर आणि पुरवठा मार्गांवर आक्रमण करण्यासाठी वापरले जात आहेत.
तुर्की आणि पाकिस्तान यांचे लष्करी संबंध गेल्या काही वर्षांत धोकादायक पद्धतीने वाढले आहेत. तुर्की सरकारने केवळ आधुनिक लष्करी उपकरणे पुरवली नाहीत, तर पाकिस्तानी सैनिकांना प्रशिक्षणही दिले आहे. या धोरणामुळे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
एर्दोगान कुटुंबाविषयीची सत्य परिस्थिती
सोशल मीडियावर सुमेय्ये एर्दोगान बायराकतार विषयी काही गैरसमज पसरले आहेत. काही ठिकाणी असा दावा होतोय की तिला तुर्कीची प्रमुख विमानसेवा कंपनी ‘चेलबी अव्हिएशन’ मध्ये हिस्सेदारी आहे. मात्र, याबाबत कोणताही अधिकृत पुरावा किंवा विश्वासार्ह माहिती उपलब्ध नाही.
चेलबी अव्हिएशन ही १९५८ मध्ये स्थापन झालेली तुर्कीची विमानतळ सेवा कंपनी असून तिचा मालकीचा मोठा भाग आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांकडे आहे. ही कंपनी भारतातही मुंबई, दिल्ली, बंगलोर आणि हैदराबादसारख्या प्रमुख विमानतळांवर सेवा पुरवते, मात्र या कंपनीच्या मालकीत सुमेय्ये एर्दोगान यांचा थेट सहभाग नसल्याचे कंपनीचे प्रतिनिधी सांगतात.
सुमेय्ये समाजकार्य व राजकीय कार्यात सक्रिय असून त्यांनी २०१३ मध्ये ‘महिला आणि लोकशाही संघटना’ (KADEM) स्थापन केली आहे. तिचा पती सेलचुक बायराकतार हा तुर्कीचा ड्रोन उद्योगातील एक प्रमुख अभियंता आहे, ज्यांनी तुर्कीचा पहिला देशांतर्गत तयार ड्रोन विकसित केला आहे.
तुर्कीविरुद्ध भारतीय बहिष्काराची वाढती लाट
भारताने पंहलगामहून झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला तुर्कीने दिलेल्या पाठिंब्यामुळे तुर्कीविरोधात देशभरात प्रचंड प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ही लाट आता सर्व क्षेत्रांमध्ये पसरली आहे: