•विदयार्थ्यांचे सुरक्षे संबधी शाळा समिती व शिक्षकाकडून हयगय झाल्यास कडक कार्यवाहीचा ईशारा ;
टोलेबाज न्यूज :
वणी :24 जुलै 026 रोजी पो.अधीक्षक कुमार चिंता यांनी ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत यवतमाळ ज़िल्हयातील माध्यमिक, उच्चमाध्यमिक शासकीय ,खासगी मराठी तसेच इंग्लिश मिडीयम चे मुख्याध्यापक व शिक्षण क्षेत्राततील अधिकारी यांचे ज़िल्हास्तरीय विध्यार्थी सुरक्षा व नशामुक्ती शिबीराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराला पो.अधीक्षक कुमार चिंता यांनी विदयार्थ्यांचे सुरक्षेसाठी संस्था चालक व शिक्षण समिती यांनी प्रत्येक शाळेत, व संपूर्ण शालेय परिसर येथे सीसीटिव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी, शालेय विदयार्थ्यांचे वाहतुकी दरम्यान महिला वार्डन असणे आवश्यक आहे, विध्यार्थी शाळेतील स्टाफ ,कर्मचारी बद्दल प्रत्यक्ष तक्रार करू शकत नाही त्याकरीता प्रत्येक शाळेत तक्रार पेटी आवश्यक असून ती आठवड्यातून किमान दोन वेळा पालक शिक्षक समितीचे अध्यक्ष व सखी सावित्री समितीचे अध्यक्ष यांचे समक्ष उघडली गेली पाहिजे व प्राप्त तक्रारीवर त्वरित कार्यवाही होणे आवश्यक आहे.
शालेय बसचालक, वाहक आणि वाहन मालक यांनी वाहतूक नियमाचे काटेकोर पालन करावे .वाहणाचे नियमित तपासणी, वाहन तांत्रिक दृष्ट्या दुरुस्त असावे, वार्डन व चालक यांची चारित्र्य पडताळणी करण्यात यावी, चालक निर्व्यसनी ,व त्याचे विरुद्ध आधी कुठल्याही प्रकारची गुन्ह्यांची नोंद नसावी 100 मिटर परिसरात तसेच शालेय वातावरणात तांबखू, गुटका, सिगारेट,ई सिगारेट किंवा तंबाखूजन्य पर्दाथाची विक्री व धूम्रपानास कायद्याने बंदी असून तसेच बदलापूर येथील विदयार्थ्यांवर झालेल्या अत्याचाराचे घटनेनंतर शासनाने काढलेल्या परिपत्रकाचे शाळा समितीने व शाळा व्यवस्थापणाने तंतोतंत पालन करणे आवश्यक असून नियमाचे उल्लंघन झाल्यास संबंधीताविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे सक्त्त आदेश देण्यात आले आहे.
या कार्यक्रमास अध्यक्ष ज़िल्हाधिकारी विकास मीना, पो. अधीक्षक कुमार चिंता,मु.कार्यकारी अ.जि.प.संतोष धोत्रे ,उ.प्रा.प.अ.प्रशांत देशमुख ,शिक्षणाधिकारी किशोर पागोरे ,. तसेच माध्यमिक, उच्चमाध्यमिक शासकीय ,खासगी मराठी तसेच इंग्लिश मिडीयम चे मुख्याध्यापक व शिक्षण क्षेत्राततील अधिकारी हजर होते.






