शेत रस्त्याच्या वादातून प्राणघातक हल्ला आरोपीवर गुन्हे दाखल “

January 23, 2026

वणी : मारेगाव येथे शेतातील येण्या जाण्याचा रस्त्याच्या वादातून एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. बाभळीचा काठीने डोक्यावर व पाठीवर मारून जिवाने मारण्याची धमकी दिली असून या प्रकरणी मारेगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर 22 जानेवारी 026 रोजी सकाळी 7 वाजता दरम्यान जीवन संभाजी इखारे वय 42 रा. पहापाळ ता. मारेगाव हे आरोपी हरिभाऊ नीलकंठ लांबट वय 52 रा. पहापळ यांचे शेतशेजारी असून आरोपीने शेतातून येण्या जाण्याचा रस्त्याच्या कारणावरून जीवन इखारे व त्याचा मुला सोबत वाद करून मुलगा घरा समोर शेकोटी शेकत असताना आरोपीने मुलास लाथाबुक्याने मारहाण करून शिवीगाळ केली

तसेच फिर्यादीचा बाभुळीची काठी डोकयावर व पाठीवर मारून जिवाने मारण्याची धमकी दिली अशा फिर्यादीचा जबानी रिपोर्ट वरून आरोपी हरिभाऊ लांबट यांचे विरुद्ध अप क्र. 17/26 कलम 118(1),352,351(2),351(3) भान्यास गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.