- संबधित प्रकरणातील दोषींवर निष्पक्ष चौकशी व तातडीने कारवाई ची मागणी.
- अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.
वणी : दि. 24 जुलै 2026 दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जचा तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा. राहुल गांधी यांना देण्यात आलेल्या अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ आज वणी तालुका काँग्रेस कमिटी व वणी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शिवाजी चौक येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनानंतर मा. राष्ट्रपती महोदया यांना उद्देशून मा. उपविभागीय अधिकारी, वणी यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात जंतर-मंतर येथील लाठीचार्जची निष्पक्ष व सखोल चौकशी करावी, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, शांततापूर्ण आंदोलन करण्याच्या घटनात्मक अधिकाराचे संरक्षण करावे, मा. राहुल गांधी यांच्याशी झालेल्या वागणुकीची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात तसेच NEET पेपरफुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
यावेळी वणी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकेश पानघाटे यांनी लोकशाहीमध्ये नागरिकांना शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार असून, आंदोलनकर्त्यांवर बळाचा वापर करणे लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याचे सांगितले. तसेच विरोधी पक्षनेत्यांशी सन्मानपूर्वक वागणे ही संसदीय परंपरा असल्याचे नमूद करून या संपूर्ण घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.
या आंदोलनात प्रदेश सचिव संजय खाडे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जय आबड , देविदास काळे,प्रमोद वासेकर, डॉ. कावडे, मोरेश्वर पावडे, रुपेश ठाकरे, टिकाराम कोंगरे, वंदना आवारी, रवींद्र होकम,अफसर शेख,सुधीर खंडाळकर, मोरेश्वर वासेकर, फरीद शेख, राजू अंकतवार, सुरज पुल्लेवार, तेजराज बोढे, राजू काळे, भास्कर वासेकर, अनंत डुंबारे, पांडुरंग पंडिले, डॉ. महेंद्र लोढा, जयसिंग गोहोकार, रवींद्र कांबळे, श्यामा तोटावार, मनीष खाडे, अशोक चिकटे, पलाश बोढे, रोहित मालेकर, वंदना धगडी, सविता रासेकर, प्रेम मेश्राम, प्रेम मंगाम, अनिल भोयर, विजय मालेकर, अशोक नागभीडकर, भास्कर आत्राम, नंदकिशोर अंबोरे, पुंडलिक गुंजेकर, सुरेखा वडीचार, अल्का मोवाडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













