टोलेबाज न्यूज
वणी : शालेय व महाविद्यालयीन जीवनात अनेक मित्र मैत्रिनी भेटतात मैत्री होते मात्र काळ पुढे सरकतो आणि अनेकांशी संपर्क तुटतो नेमक कोण कुठे आहे याचा थांग पता लागत नाही अशा वेळेस मित्रा मधूनच कोणीतरी पुढे येतो आणि मैत्रीचा ओढीने एकत्र येण्याची संकल्पना बोलून दाखवितो.यातूनच मग मैत्रीचा मेळा भरतो आणि तब्बल 25 वर्षा नंतर सारे एकत्र येऊन पुन्हा जुन्या आठवणी जगवितात अशीच वणीतील लोकमान्य टिळक महाविद्यालयातील 2000 च्या बॅचमधील विध्यार्थ्यानी ही अनुभूती घेतली.
येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात नुकताच हा स्नेह मिलन सोहळा पार पडला. या सोहळ्यात एखाद्या लग्न समारंभाचे स्वरूप होते. पाहुण्यांच्या स्वागताला चक्क बँड सांगण्यात आला होता फुलांचा वर्षावात वाजत गाजत पाहुणे आणि माजी विध्यार्थी विध्यार्थीनीचे सभागृहात आगमन झाले. उदघाटनीय कार्यक्रमा नंतर विध्यार्थ्यानी मनोगत व्यक्त्त केले. नंतर गीत गायन ,कविता वाचन, नूत्य आणि विविध खेळाचा माध्यमातून धमाल केली. जुने वर्ग ,ग्रंथालय आणि महाविद्यालयाचा परिसर पाहून अनेकजण भावुक झालेत 25 वर्षानंतर आम्ही एकत्र आलोय आणि तीच मैत्री पुन्हा अनुभवली अशा भावना सर्वांनी व्यक्त्त केल्या .
कार्यक्रमाची सुरवात उदघाटनीय सोहळ्यानी झाली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य प्रसाद खानझोडे, प्रा.अनिल हूड ,प्रा.सुधाकर रेड्डी ,डॉ. अजय देशपांडे ,सहसचिव अशोक सोनटक्के ,डॉ.संदीप तुंडुरंवार, डॉ.शंकर वऱ्हाटे, डॉ.रेखा पवार ,डॉ.अभिजित अणे, प्रा.उमेश व्यास मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रा.संतोष डाखरे यांनी प्रास्ताविक संयुक्त्तरित्या प्रवीण खानझोडे आणि वैशाली पाटील यांनी तर आभार गोपाल गव्हाणे यांनी मानले.













