टोलेबाज न्यूज
वणी : बोर्डा येथे स्व:मारोती गजानन पायघन यांचे स्मृतीप्रित्यर्थ जय संतोषी माँ क्रीडा व समस्त ग्रामवासी बोर्डा द्वारा सामन्याचे आयोजित करण्यात आले असून यांनी बोर्डा व रासा येथे खेळल्या जाणाऱ्या हॉलीबॉल ची चाळीस वर्षाची परंपरा जोपासत या खेळातून गावातील तरुण वर्ग व लहान मुलांमध्ये शारीरिक विकास व नवचैतन्य मिळत आहे.तसेच 2 फेब्रुवारी 026 रोजी प्रा.हेमंत चौधरी यांचा हास्य दर्पनाचा मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे नागरिकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेण्याचे आव्हान मंडळाचे वतीने करण्यात आले आहे.
भव्य हॉलीबॉलचे खुले सामन्याचा उदघाटन सोहळा दि.31 जानेवारी 026 रोजी संध्याकाळी 8 वाजता प्रमुख पाहुणे आमदार संजयभाऊ देरकर, प्रमोद वासेकर (अध्यक्ष वसंत जिनिंग वणी )दिलीप काकडे ,महेश सोमलवार ,विलास कालेकर ,पुरुषोत्तम आवारी, अनिल कोठारी ,देवेंद्र ताजने, वसंता येवले ,शीतल सातपुते ,मंगेश तलांडे, सतीश राजूरकर ,गणेश पायघन ,विलास झाडे, सुरेश दुधकोहळे ,वासुदेव मल्लूरवार सर ,अविनाश लडके,प्रवीण झाडे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सौं आशाताई प्रवीण झाडे (सरपंच ग्रामपंचायत बोर्डा)व सर्व ग्रामपंचायत सदस्य, समस्त ग्रामवासी बोर्डा यांचा उपस्थितीत दीप प्रज्वलन करून संपन्न झाला.
सूत्र संचलन देवेंद्र बच्चेवार सर,प्रास्तविक अविनाश लडके सर,आभार प्रदर्शन वासुदेव मल्लू्रवार सर यांनी केले.













