टोलेबाज न्यूज
वणी : यवतमाळ शहराततील एका बार मध्ये दोन लाचखोर लिपकास पन्नास हजार रुपयाची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ पथकाला रंगेहात पकडण्यात यश आले असून शहरात खडबड उडाली आहे.
माहिती नुसार कळंब येथील शेताचे सौदेपत्र झाले होते ती जमीन भोगवटदार वर्ग 2 मधून वर्ग 1 करण्याकरीता मूळमालकाने ज़िल्हाधिकारी यवतमाळ येथे अर्ज केला व तक्रारदार यास पाठपुरावा करण्यासाठी सांगितले होते तक्रारदाराने काही दिवसापूर्वी सदर कामानिमित्त लाचखोर लिपिक गोपाल मोहोड (महसूल सहाय्यक महसूल विभाग ज़िल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ) यांची ज़िल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे भेट घेतली असता लाचखोर लिपिक गोपाल मोहोड यांनी तक्रारदारास सदर प्रकरण निकाली काढून भोगवटदार वर्ग 2 मधून वर्ग 1 चा आदेश काढण्याकरीता 75,000 रू. लाचेची मागणी करून सदर रक्कम त्याचे कार्यालयातील जुने लिपिक राहुल कुयटे (प्रतिनियुक्ती तहसील कार्यालय पांढरकवडा )यांना देण्यास सांगितले होते.
अशी तक्रार दि.6 मार्च 026 रोजी अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ येथे देण्यात आली होती त्या वरून दि.6 मार्च 026 तसेच दि.7 मार्च 026 /दि.10 मार्च 026 /दि.12 मार्च 026 व दि.13 मार्च 026 रोजी केलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान लाचखोर लिपिक गोपाल मोहोड यांनी लाचेची मागणी रकमेसंबधी लाचखोर लिपिक राहुल कुयटे यांची भेट घेण्यास सांगितले असता .
दि.13 मार्च 026 रोजी लचेचा पडताळणी कार्यवाही दरम्यान सदर प्रलंबित प्रकरण निकाली काढण्याकरीता लाचखोर लिपिक गोपाल मोहोड यांचे करीता तडजोडी अंती लाचेची रक्कम 50,000 रू.घेण्याचे मान्य करून दि. 13 मार्च 026 रोजी स्टेट बँक चौक येथील फ्रेंड्स बार येथे तक्रारदारार यांचे कडून 50,000 रू.लाच स्विकारल्याने लाच लुचपत विभागाचा पथकाने रंगेहात पकडण्यात आले असून पुढील तपास यवतमाळ शहर पोलीस स्टेशन करीत असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
ही कार्यवाही पो.अधीक्षक बापू बांगर अँटी करप्शन ब्युरो अमरावती,अप्पपो.अधीक्षक सचिन्द्र शिंदे अँटी करप्शन ब्युरो अमरावतीयांचे मार्गदर्शनाखाली पो.उपअधीक्षक अभय आष्टेकर, पोनि. अर्जुन घनवट व सर्व अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांनी यशस्वी पार पाडली.












