टोलेबाज न्यूज :
वणी : दि. 11 मार्च 026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ येथील पथक शहरात फरार आरोपी शोध घेण्याकारिता पेट्रोलिंग करीत असताना रात्री 2 वाजता सुमारास गुप्त्त माहिती मिळाली कि एक ईसम पांढऱ्या रंगाची टीशर्ट व पॅन्ट घालून कमरेला अवैध पिस्तूल (अग्निशत्र )खोचून भाग्य नगर डोर्ली परिसरात फिरत आहे.
अशा खात्रीशीर माहिती वरून पोलीस पथक दोन पंचासह भाग्य नगर डोर्ली परिसर गाठले तेथे रोडच्या साईडला असलेल्या मंगेश पान सेंटर समोर एक ईसम संशयास्पद आढळून आला त्यास पथकाने ताब्यात घेऊन पंचांसमक्ष नाव विचारले असता एजाज शेख हसन शेख वय 34 वर्षे रा. कुरेशी पुरा कळंब चौक यवतमाळ असे सांगितले .
त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला खोचून स्टीलच्या धातूची पिस्तुल (अग्निशत्र) अंदाजे कि.50,000 रू.मिळून आले त्या ईसमास शस्त्र बाळगण्याचा परवाना बाबत विचारले असता परवाना नसल्याचे सांगितले असता आरोपीस ताब्यात घेहून त्याचा विरुद्ध यवतमाळ शहर पोलीस ठाणे येथे 3,25 भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
ही कार्यवाही पो.अधीक्षक. कुमार चिंता ,अप्प. पो.अधीक्षक अशोक थोरात ,पो.नि.सतीश चवरे यांचा मार्गदर्शनात सपोनि.दत्ता पेंडकर ,पोउनि.धनराज हाके ,पो.अमलदार सुनील खंडागळे, सुधीर पांडे ,निलेश निमकर ,सुधीर पिदूरकर ,रजनीकांत मडावी ,नरेश राऊत सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी पार पाडली .












