कत्तलीसाठी गौवंशाची तस्करी करणारे दोघे आरोपी अटकेत – 22 लाखांचा मुद्देमाल जप्त

वडकी : आज दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 1.30 वाजेच्या सुमारास वडकी पोलीस स्टेशन हद्दीतील देवधरी घाट, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर कारवाई करण्यात आली. नागपूरहून हैद्राबादकडे क्रमांक MH.40.CT.2503 या आयशर वाहनातून कत्तलीसाठी गौवंशाची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलीस स्टाफने सापळा रचून वाहन पकडले.

तपासणीदरम्यान वाहनात 8 बैल आढळून आले. प्रत्येकी किंमत 25,000/- रुपये प्रमाणे एकूण 2,00,000/- रुपये किमतीचे बैल व सुमारे 20,00,000/- रुपये किमतीचे आयशर वाहन असा एकूण 22,00,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी नामे (1) मोहसिन खान मुजफ्फर खान (28) रा. चंगेरा, ता. जि. गोंदिया व (2) आयान सय्यद हमीद सय्यद (21) रा. राजेगाव, ता. जि. गोंदिया यांना ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत सदर बैल हे नागपूर येथील अब्दुल अजीज शेख यांचे असल्याचे समोर आले.

या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5, 5(अ), 5(ब) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदरची कारवाई मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात, सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय अधिकारी पांढरकवडा श्री. रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही कारवाई वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री. सुखदेव भोरकडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार स. फौ.827 रमेश आत्राम, पो.हवा.2214 भोजराज करपते, पो.हवा.1823 अमोल चौधरी, पोकॉ.2383 अरविंद चव्हाण, पोकॉ.2598 विनोद मोतेराव व चालक स. फौ.716 दिपक मडकाम यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

मनसेचा वणीत ‘शंखनाद’!

यवतमाळ : वणी तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार आणि शहराध्यक्ष अंकुश बोढे यांच्या नेतृत्वात आज विविध सामाजिक आणि राजकीय पक्षांच्या शेकडो पुरुष – महिला कार्यकर्त्यांनी मनसेत जाहीर प्रवेश केला. मनसे नेते राजूभाऊ उंबरकर यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश पार पडला. शहरातील शेतकरी मंदिरात आयोजित या कार्यक्रमात पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन १०० पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आणि त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या सोपवल्या. यावेळी मोठ्या संख्येने मनसेचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. या नव्या जोमामुळे वणीत मनसेची ताकद आणखी वाढणार आहे.

वाकलेल्या वीज खांबामुळे धोका

वणी : वणी लगतच्या मानकी येथील वीज खांब वाकलेल्या अवस्थेत असून, यामुळे अपघाताचा धोका बळावला आहे. गावातील वर्दळीच्या रस्त्यावर एक खांब धोकादायकरीत्या झुकला आहे. तो कोसळू नये म्हणून त्याला लाकडाच्या काठीचा आधार देण्यात आला आहे. पहिल्याच पावसात वाकलेला हा खांब दुरुस्ती न करता दोन महिन्यांपासून लाकडाच्या काठीचा आधार देऊन आहे. मात्र संबंधित्यांचे अवलक्ष होत आहे असें नागरिकांतून बोलल्या जात आहे.

शिक्षकांना शाळाबाह्य कामे देऊ नये..

वणी : राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री ना.दादाजी भुसे हे शैक्षणिक गुणवत्ता आढावा सभेसाठी चंद्रपूर येथे आलेले असतांना त्यांना भेटून अशैक्षणिक कामे व संचमान्यता या विषयांचे निवेदन महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस हरीश ससनकर यांनी दिले.
जिल्हा परिषद नगर परिषद शाळेतील शिक्षकांच्या मागे रोज नवनवीन अशैक्षणिक कामे वाढत आहेत त्यामुळे त्यांना शिकवायला वेळ कमी मिळत आहे याचा परिणाम विद्यार्थी गुणवत्तेवर होत आहे.

रोज च्या रोज शिक्षण तसेच अन्य विभागाच्या लिंक भराव्या लागतात, अँप डाउनलोड करून फोटो माहिती अपलोड करावी लागते या सर्व अशैक्षणिक कामामुळे शिक्षक त्रस्त झाले आहेत, त्यात निवडणूक आयोगाने बी.एल.ओ साठी अन्य कर्मचाऱ्यांना सोडून शिक्षकांच्या नेमणुका प्राधान्याने केल्या आहेत त्यात काहींना शाळेच्या गावापासून 10 ते 20 किलोमीटर अंतरावरील बूथ वर मतदार नोंदणी ची कामे दिली आहेत, तसेच एका शाळेतील अनेक शिक्षकांचे नंबर लावल्यामुळे शाळा घ्यायची कशी व शिकवायचे कधी ? हा प्रश्न शिक्षकापुढे निर्माण झाला आहे निवेदनातून हे बी.एल.ओ चे काम काढून टाकण्याची विनंती करण्यात आली आहे.

नवीन संचमान्यतेमुळे राज्यातील शिक्षक संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे त्यामुळे वर्ग अनेक व शिक्षक एक अशी स्थिती निर्माण झाली आहे यापुढे गरिबांच्या शिक्षणासाठी शासकीय शाळा टिकवायच्या असतील तर नवीन संचमान्यता लागू करण्याचा फेरविचार करण्यात यावा अशी सुद्धा मागणी राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, राज्य कोषाध्यक्ष जी. एस. मंगनाळे , यवतमाळ जिल्हाध्यक्ष राठोड, जिल्हा सरचिटणीस आनंद कुमार शेंडे आदींचा स्वाक्षऱ्या असलेल्या निवेदनातून शालेय शिक्षण मंत्री यांना करण्यात आली आहे.