गणेशपूर मुकुटबनरोड ताज हॉटेल भीषण अपघात “चिमुकली चा उपचारादरम्यान मृत्यू तर वडील गंभीर जखमी ”

January 27, 2026

वणी :शहरातील मुकुटबनरोड ताज हॉटेल समोर 24 जानेवारीला 026 ला संध्याकाळी 9 वाजता दरम्यान मोटारसायकल स्वारास मागून येणाऱ्या भरधाव ट्रकणे जोरदार धडक दिली धडक एवढी  भीषण होती कि मोटारसायकलचा अक्षशा चुराडा होऊन गाडीवरील साडेचार वर्ष्याच्या चिमुकल्या मुलीचा जबर धडकेने मृत्यू झाला आहे या घटनेने परिसरातील नागरिकात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

माहितीनुसार ड्रीमलँड सिटीतील रहिवासी श्रीनिवास गोणलावार वय 37(वणी पो.स्टेशन येथे कार्यरत )असून श्रीनिवास हे काही कामानिमित्त आपल्या साडेचार वर्षीय मुलीला बाहेर घेऊन गेले असता काम आटपून संध्याकाळी 9 वाजता दरम्यान घरी वापस जात असताना गणेशपूर मुकुटबन रोड ताज हॉटेल जवळ त्याचा मोटारसायकलला मागून येणाऱ्या एका भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली धडक एवडी भीषण होती मोटारसायकलचा अक्षरशः चुराडा होऊन साडेचार वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्याने तिला नागरिकांनी ताबडतोब सुगम हॉस्पिटल नेले असता उपचारा दरम्यान सदर चिमुकल्या मुलीचा मृत्यू झाला  वडिलांना गंभीर दुखापत झाल्याने खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

अज्ञात वाहन चालका विरुद्ध अप क्र. 48/26 कलम 281,125(A)BNS नुसार गुन्हा नोंद करून पुढील तपास वणी पोलीस करीत आहे अशा भरधाव वेगाने चालणाऱ्या वाहणामुळे निष्पाप बळी गेल्याने परिसरातील नागरिकात संताप व्यक्त करण्यात येत आहे.