टोलेबाज न्यूज
•ज़िल्यातील 04 गुन्हे उघड, चार चाकी वाहणासह 20 बॅटऱ्या जप्त्त
वणी : यवतमाळ 9 फेब्रुवारी 026 रोजी चोरी केलेल्या बॅटऱ्या विक्री करण्यासाठी तीन चोरटे तीन चाकी अँपे वाहनाने यवतमाळ परिसरात फिरत असल्याच्या गुप्त्त माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आरोपी पकडण्यात मोठे यश आले असून 2,15,000 रू.मुद्देमाल जप्त्त करण्यात आला आहे .
सविस्तर स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पथक चोरीचा गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोधात प्रट्रोलिंग करीत असतांना गुप्त्त माहितीवरून आरोपी परमेश्वर सुनील राठोड वय 25 रा.सिंदखेड ता. नेर ज़ि. यवतमाळ, हा त्याचे साथीदारासह पो.स्टे.दारव्हा ,यवतमाळ ग्रामीण आणि अवधूतवाडी हद्दीतील वाहनाचे बॅटऱ्या चोरी करून ते त्याचा साथीदारासह बॅटऱ्या विक्री करिता तीन चाकी अँपे क्र.MH-29-BD-1689 मध्ये लोडींग करून फिरत आहे .वाहणाचा शोध घेतला असता पोबारू लेआउट रस्त्याने सदर वाहन दिसून आले वाहन थांबवून वाहन चालक व मागील कॅरिअर मध्ये दोन इसम तसेच बॅटऱ्या लोड केलेल्या दिसून आल्याने सदर तिन्ही इसमांना त्याचे नाव विचारले असता चालक1) शेख रब्बू शेख नवाब वय 26 रा.डेहणी ता.दिग्रस ह.मु. अलकबीर नगर यवतमाळ , 2)परमेश्वर सुनील राठोड वय 25 रा.सिंदखेड ता. नेर ज़ि. यवतमाळ, 3)साहिल शंकरराव खवासे वय 21 रा.अशोक नगर नेर ज़ि.यवतमाळ यांना ताब्यात घेतले.
त्याचा ताब्यात असलेल्या अँपे मधील बॅटऱ्याचे मालकी हक्का बाबत विचारना केली असता त्यानी उडवा-उडवीची उत्तरे देत असल्याने विश्वासात घेऊन पंचांसमक्ष गुन्ह्याची कबुली देत दारव्हा हद्दीतील गिट्टी खदान येथून, ग्राम दहेली ता.दारव्हा तसेच यवतमाळ शहरातील 02 ठिकाणावरून चोरी करून विक्री करिता घेऊन जात असल्याचे सांगीतले.
तिन्ही ईसमाकडून पंचांसमक्ष चोरीतील 20 बॅटऱ्या व गुन्ह्यात वापरलेले अँपे वाहन असा 2,15,000 रू.मुद्देमाल हा पुढील कायदेशीर कारवाईकामी जप्त करण्यात आला.
आरोपीचा सांगितल्या प्रमाणे बॅटऱ्या चोरी केले असल्याच्या घटनास्थळ बाबत अभिलेख तपासला असता नमूद मुद्देमाल हा खालील प्रमाणे गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले.
- पो.स्टे.दारव्हा अप.क्र.0068/2026 कलम 303(2)भा.न्या.सं.
- पो.स्टे.दारव्हा अप.क्र.0027/2026 कलम 303(2)भा.न्या.सं.
- पो.स्टे.यवतमाळ ग्रामीण अप. क्र.0635/2026 कलम 303(2)भा.न्या.सं.
- पो.स्टे.अवधूतवाडी अप.क्र.1576/2026 कलम 303(2)भा.न्या. सं.
ही कार्यवाही पो.अधीक्षक कुमार चिंता ,अप्पर पो.अधीक्षक अशोक थोरात ,पो.नि.स्था.गु.शा.सतीश चवरे यांचा मार्गदर्शनात सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यांनी यशस्वीरित्या पार पाडली.













