टोलेबाज न्यूज
वणी :पांढरकवडा शहरात समाजाला हादरा बसणारी एक घटना घडली आहे शहरातील हनुमान वॉर्ड जवळील नाल्यात नवजात बाळ रडत असल्याचा आवाज येताच काही नागरिकांनी बाळाला बाहेर काढून ताबडतोब ज़िल्हा रुग्णालयात नेऊन त्या नवजात बाळाला नवीन जीवदान दिले या मनहेलावून टाकणाऱ्या घटनेने शहरातील नागरिकांत संताप व्यक्त केल्या जात आहे.
दि. 28 जानेवारी 2026 रोजी हनुमान वॉर्ड पांढरकवडा येथील केतन गजानन कटकोजवार वय 33 यांचा घरा शेजारील नाल्यात दुपारी 3/30 वाजता दरम्यान नवजात बाळाचा रडण्याचा आवाज येत असल्याने केतन आणि घरा शेजारी राहणाऱ्या इसमानी त्या नाल्यात पाहणी केली असता त्याना नवजात स्त्री जातीचे बाळ दिसून आले सदर लोकांचा मदतीने बाळाला बाहेर काढून उपचाराकरिता उपज़िल्हा रुग्णालय पांढरकवडा दाखल करण्यात आले व नंतर केतन कटकोजवार यांनी पांढरकवडा पो. स्टेशन ला जाऊन रीतसर तक्रार दिली तक्रारीवरून पांढरकवडा पो. स्टेशन येथे अपराध क्र. 199/2026 कलम 93 बी.एन.एस.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्हातील नवजात स्त्री बालकाचे माता पिता यांचा शोध घेण्याकारिता पो.स्टेशनला तात्काळ पथक तयार करण्यात आले तपास पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या दोन तासात नवजात स्त्री बालकाची माता अर्चना सुनील शिवरकर वय 28 वर्षे व पिता सुनील दिगांबर शिवरकर वय 31 वर्षे दोन्ही रा. नेहरू वॉर्ड असल्याचे कबूल करून गुन्हा उघडकीस आला.
ही कार्यवाही पो.अधीक्षक कुमार चिंता ,अप्पर पो. अधीक्षक अशोक थोरात, सहाय्यक पो.अधीक्षक रॉबिन बन्सल यांचा मार्गदर्शनात पोनि.एल.डी.तावरे यांचा सूचनेवरून पोउपनि.नितीन सुशीर तसेच पुढील तपास पांढरकवडा पोलीस करीत आहे.













