•शेकडो पुरुष – महिला कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश
टोलेबाज न्यूज वार्ता :
यवतमाळ : वणी तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार आणि शहराध्यक्ष अंकुश बोढे यांच्या नेतृत्वात आज विविध सामाजिक आणि राजकीय पक्षांच्या शेकडो पुरुष – महिला कार्यकर्त्यांनी मनसेत जाहीर प्रवेश केला. मनसे नेते राजूभाऊ उंबरकर यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश पार पडला. शहरातील शेतकरी मंदिरात आयोजित या कार्यक्रमात पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन १०० पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आणि त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या सोपवल्या. यावेळी मोठ्या संख्येने मनसेचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. या नव्या जोमामुळे वणीत मनसेची ताकद आणखी वाढणार आहे.













