•ज़िल्हा वाहतूक शाखा उपविभाग वणी यांना तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचे निवेदन
•8 दिवसाचा अल्टीमेट अन्यथा मनसे व ग्रामस्थांच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा
टोलेबाज न्यूज
वणी :नांदेपेरा बायपास ते खैरी वडकी मार्गांवरील सुरु असलेल्या जड वाहतूकिस ज़िल्हाधिकारी यवतमाळ यांनी नांदेपेरा ते खैरी वडकी हा मार्ग 10 टना पेक्षा जास्त वजनाच्या वाहणासाठी त्रांत्रिकदृष्टया सक्षम नसल्याने बंद करण्यासाठी 10/10/2022 मोटार वाहन 1988 चा कलम 115 नुसार स्पष्ट आदेश देऊन सदर जड वाहतूक खैरी वडकी, करंजी ,मारेगाव मार्गे वणी या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती.
तरी प्रशासकीय आदेशाला केराची टोपली दाखवून सर्रास या मार्गांवरून प्रचंड जड वाहतूक सुरु आहे त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून धुळीच्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या मार्गांवर शाळकरी मुले, दुचाकी स्वार व हलकी वाहने मोठ्या प्रमाणात येजा करीत असतात जड वाहनांचा अतिवेगामुळे व निष्काळजीपणामुळे रोज छोटे मोठे अपघात होत आहेत हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला असून परिसरातील नागरिकांचा जीवितला कायम स्वरूपी धोका निर्माण झाला आहे.
शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही व जड वाहतूकदारावर वचक नसल्याने या मार्गांवरील ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. या मार्गांवरील बेकायदेशीर जड वाहतूकीवर येत्या आठ दिवसात कार्यवाही झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व या परिसरातील सर्व ग्रामस्थांचा वतीने रस्ता रोको व तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन करण्यात येईल अशा ईशारा निवेदनातून देण्यात आला.
यावेळी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार,लकी सोमकुवर,प्रवीण कळसकर,वैभव पुराणकर,आकाश काकडे,धीरज पचे,रंजित बोन्डे,धीरज बगवा,कैलास काकडे,योगेश तुराणकर,सौरव राजूरकर,अंकित काकडे,रुपेश जोगी,कवडू काकडे,चेतन सूर,सुरज काकडे,दिनेश झिले,अतुल तेलतुंबडे,यासंह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.













