टोलेबाज न्यूज वार्ता :
वणी : वणी लगतच्या मानकी येथील वीज खांब वाकलेल्या अवस्थेत असून, यामुळे अपघाताचा धोका बळावला आहे. गावातील वर्दळीच्या रस्त्यावर एक खांब धोकादायकरीत्या झुकला आहे. तो कोसळू नये म्हणून त्याला लाकडाच्या काठीचा आधार देण्यात आला आहे. पहिल्याच पावसात वाकलेला हा खांब दुरुस्ती न करता दोन महिन्यांपासून लाकडाच्या काठीचा आधार देऊन आहे. मात्र संबंधित्यांचे अवलक्ष होत आहे असें नागरिकांतून बोलल्या जात आहे.













