टोलेबाज न्युज वार्ता :अभय गावंडे यवतमाळ
वडकी : आज दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 1.30 वाजेच्या सुमारास वडकी पोलीस स्टेशन हद्दीतील देवधरी घाट, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर कारवाई करण्यात आली. नागपूरहून हैद्राबादकडे क्रमांक MH.40.CT.2503 या आयशर वाहनातून कत्तलीसाठी गौवंशाची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलीस स्टाफने सापळा रचून वाहन पकडले.
तपासणीदरम्यान वाहनात 8 बैल आढळून आले. प्रत्येकी किंमत 25,000/- रुपये प्रमाणे एकूण 2,00,000/- रुपये किमतीचे बैल व सुमारे 20,00,000/- रुपये किमतीचे आयशर वाहन असा एकूण 22,00,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी नामे (1) मोहसिन खान मुजफ्फर खान (28) रा. चंगेरा, ता. जि. गोंदिया व (2) आयान सय्यद हमीद सय्यद (21) रा. राजेगाव, ता. जि. गोंदिया यांना ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत सदर बैल हे नागपूर येथील अब्दुल अजीज शेख यांचे असल्याचे समोर आले.
या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5, 5(अ), 5(ब) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदरची कारवाई मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात, सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय अधिकारी पांढरकवडा श्री. रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही कारवाई वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री. सुखदेव भोरकडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार स. फौ.827 रमेश आत्राम, पो.हवा.2214 भोजराज करपते, पो.हवा.1823 अमोल चौधरी, पोकॉ.2383 अरविंद चव्हाण, पोकॉ.2598 विनोद मोतेराव व चालक स. फौ.716 दिपक मडकाम यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.













