टोलेबाज वार्ता पत्र : रवि घुमे, मारेगाव
वणी : मारेगाव हद्दीतील वनोजा देवी येथे 03ओक्टोम्बर 2025 च्या रात्री सुमारे 7 वा. फिर्यादी अभिजीत दिनेश नगराळे वय 20 वर्ष रा. पंचशील चौक वनोजा देवी हे अनिल झाडे यांचे पानठेल्यासमोर बसुन असताना यातील आरोपीतांनी संगणमत करुन जुन्या मजुरीच्या पैश्याच्या कारणावरुन वाद करुन हातातील कड्याने फिर्यादीचे डोक्यावर मारुन जखमी केले. तसेच फिर्यादीचा भाऊ व वडील यांना थापडाबुक्क्याने मारहान करुन शीविगाळ केली व जिवाने मारण्याची धमकी दिली. अशा फिर्यादीच्या जबानी रिपोर्ट वरुन आरोपी1) साहिल सुखदेव काळे वय 21 वर्ष 2) राकेश सुखदेव काळे वय 27 वर्ष दोन्ही रा. वनोजा देवी तालुका मारेगाव यांच्यावर भान्यास कलम 314/25 कलम 118(1), 352,351(2),351(3), सदरचा गुन्हा दाखलं करण्यात आला पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.













