टोलेबाज न्युज :अभय गावंडे
वणी : यवतमाळ शहरात जुने भांडण पुन्हा रंगले आणि एका तरुणाची जखमी अवस्था झाली. 14 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी सुमारे 6.30 वाजता दरम्यान कुंभारपुरा येथील कब्रस्थानासमोर घडली.
सविस्तर वृत्त शेख सज्जाद शेख अकबर(वय 28) याला, जावेद शाह यासीन शाह (वय 40 रा. कुंभारपूर कळंब चौक यवतमाळ) आणि गड्डु तात्या उर्फ मोहम्मद अहेफाज मोहम्मद जावेद (वय 25) यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण केली. आरोपींनी हातातील लोखंडी पाईप आणि चाकू वापरून शेख सज्जादच्या पोट, पाय, छाती आणि मांडीवर जबर मारहाण केली, ज्यामुळे त्याला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या असून शेख अकबर शेख रोशन (वय 70 रा. कुंभारपुर कळंब चौक यवतमाळ) यांच्या फर्यादीच्या जवानी रिपोर्ट वरून 894/25 अंतर्गत कलम 109, 3(5) गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.













