•दारूपिण्या करीता पैसे न दिल्यास महिलेचा खून
टोलेबाज न्यूज :अभय गावंडे
वणी : दि. 18 नोव्हेंबर 025 रोजी आरती चेतन गोंधळे वय 24 वर्ष रा. करंजी काजी जी. वर्धा यांच्या फिर्यादी वरून तीचे आईला डोक्याला व कमरेजवळ कशाने तरी वार करून जिवाने ठार मारले अशा दिलेल्या रिपोर्ट वरून पोस्टे वाभूळगांव येथे अप.क. 703/025 कलम 333,103 (1) भान्यास अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सविस्तर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून पो.नि. सतिष चवरे यांचे आदेशाने यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ व पोलीस स्टेशन याभूळगांव यांनी या गुन्हयातील आरोपीचा शोध घेत असताना गुप्त माहिती वरून मिळाली पूर्वज रमेश पारधी बय 29 वर्ष रा.दिघी , बाभूळगांव याने केला असल्याचे माहिति वरून तो त्याचे राहते घरी असल्याचे खात्रीशीर माहिती वरून तेथे जावुन त्याचा शोध घेतला असता सदर युवक तेथे मीळून आला.
त्याचे नांव विचारला असता त्याने आपले नांव पूर्वज रमेश पारधी वय 29 वर्ष रा.दिणी , वाभूळगांव असे सांगीतल त्यास पोलीस स्टेशन याभूळगांव येथे आणून अधिक विश्वासात घेवून गुन्हयासंबंधाने विचारपुस केली असता त्याने सांगीतले कि, तो व मृतक नामे महानंदा प्रकाश चहदिकर हे घराशेजारी राहत असुन मी महानंदा हौस तीचे घरी काल दारूकरीता पैसे मागण्याकरीता गेलो होतो परंतु तिने मला पैसे दिले नाही त्यामुळे तीचा व माझा काल वाद झाला त्या वादानंतर मी तीचे डोक्यावर व कमरेला मारुन तिला ठार मारले व ती मरण पावल्यानंतर मी माझे घरी निघुन गेलो अशी गुन्हयासी कबुली दिली.त्यास ताब्यात पेवून पुढील कार्यवाही करिता पोलीस स्टेशन बाभुळगांव यांचे ताब्यात देण्यात आले.
हि कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक, यवतमाळ कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, पोनि. सतिश सवरे यांगे मार्गदर्शनात पोनी. एल. डी. तावरे सपोनी रोहीत येवरे, पोउपनि गजानन राजमल्लू, सफी/से. साजिद, पोहवा/रूपेश पाली, पोहवा/योगेश डगवार, पो.हवा / अजय डोळे, पोहवा/प्रशांत हेडाउ, पो. हवा. रुनुराज मेडवे पोशि/सुनिल पैठणे, आकाश सुर्यवंशी, पोशि देवेद होले सर्व स्थागुशा. तसेन स.फौ. दिपक आसकर, पो. हवा.राजू कुडमेथे, पोशी सुरज गजभोये पोशी रंजीत गुरनुले पोलीस स्टेशन याभुळगांव यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.













