3 आरोपीसह चोरीतिल मुद्देमाल जप्त बाभुळगांव पोलीसांची कारवाई “

November 21, 2025

वणी: बाभुळगांव हद्दीत दि.28/03/025 रोजी अवैद्य खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणात तत्कालीन प्रभारी तहसिलदार बाभुळगांव प्रज्वल मसराम यांनी वाहन गौन खनिज उत्खनन व वाहतूक करीत असतांना तपासणी करून टॅक्टर वाहनामध्ये रेती आढळून आल्यामुळे टॅक्टर ट्रॉली क्र. MH 29 BV 2783 हे जप्त करुन तहसिल कार्यालयांचे आवारामध्ये ठेवण्यात आले होते.

परंतू टॅक्टर दि. 12नोव्हेंबर 025 रोजी पर्यंत सुस्थितीत होते दि. 13नोव्हेंबर 025 रोजी रात्री दरम्यान अज्ञात इसमांनी जप्त टॅक्टर मधील हायड्रोलीक पटटे, पंप, व इतर साहीत्य कि. 50,000 रू. ते 55,000 रु. चे चोरी करुन नेले अशा राजेश बोबडे, शिपाई तहसिल कार्यालय बाभुळगांव यांचे रिपोर्ट वरुन बाभुळगांव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

या गुन्हयाचे तपासामध्ये बाभुळगांव पोलिसांनीयांनी गोपनीय माहीतीचा आधारे शोध घेवून गुन्ह्यातील आरोपी 1) शेख अदनान मोहम्मद रफिक वय 22 वर्ष रा. राणी अमरावती 2) शेख महेफुज शेख मेहबुब वय 21 वर्ष रा. नेहरु नगर, बाभुळगांव यांना ताब्यात घेवून त्यांना विचारपूस केली असता त्यांचे कडून मिळालेल्या माहीती वरुन त्यांनी आरोपी 3) मोहम्मद जैद शेख रफिक वय 19 वर्ष रा. मज्जीदपुरा बाभुळगांव याचे सांगण्यावरुन चोरी केल्याचे सांगीतल्याने त्यास अटक केली. त्यांचे कडून तहसिल कार्यालय बाभुळगांव येथे जप्त असलेले टॅक्टर/ट्रॉली क्रमांक MH 29 BV 2783 चे टॅक्टर मुंडाचे चेंबर, हायड्रोलीक पटटे, पंप असे साहीत्य कि. 50 ते 55 हजार रु. चे आरोपी कडून जप्त करण्यात आले.

सदरची कार्यवाही मा. कुमार चिंता, पोलीस अधीक्षक , अशोक थोरात, अपर पोलीस अधीक्षक, दिनेश बैसाने उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनात श्री एल.डी. तावरे, पोनि., दिपक आसकर, सहा. पो.उप नि. निलेश भुसे, पोलीस हवालदार, मंगेश कळसकर, पोलीस हवालदार पो.स्टे. बाभुळगांव यांनी केली.