1,42,060 रू. मुद्देमालासह 3 आरोपी अटक
टोलेबाज न्यूज:अभय गावंडे
वणी :21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी अंदाजे 7/50 वाजता यवतमाळ शहरातील बसस्थानक परिसरात अंमली पदार्थ व गांजाची डिलींग होत असल्याची खात्रीशीर माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने बसस्थानक परिसरात सापळा लावून एका निळ्या रंगाची सूटकेस असलेल्या इसमासह गांजा घेण्या करीता आलेल्या दोघा इसमास ताब्यात घेऊन गांजा विक्रीचा डाव स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने हाणून पाडला.
सविस्तर दि. 21 नोव्हेंबर 025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवतमाळ शहरात अवैध धंदे विरुध्द कारवाई करीता पेट्रोलिंग करीत असता गोपनीय माहिती मिळाली की, ओडीसा राज्यातील एक इसम यवतमाळ बसस्थानक परिसर अंमली पदार्थ विक्रीस घेवून येत असून तो गांजाची डिलींग बसस्थानक परिसरात करणार असल्याचे व त्याचे हातात एक निळ्या रंगाची सूटकेस आहे. अशा खात्रीशीर माहिती वरून पथकाने क्षनाचाही विलंब न करता या बाबतीत वरिष्टांना माहिती देवून छापा कारवाई करीता सर्व कायदेशीर बाबींची पुर्तता करुन माहिती प्रमाणे यवतमाळ शहरातील बसस्थानक परिसरात सापळा लावला.
सायंकाळी अंदाने 7/50 वाजताचे सुमारास एक इसम व त्याचे कडुन गांजा घेण्या करीता आलोले दोघे असे एकूण तिनही मोक्यावर मिळून आल्याने त्यांना पंचासमक्ष नांव पत्ता विचारला असता त्यांनी आपले नांव 1) बैस्नव हरा प्रधान वय 31 वर्ष, रा. पानासाही पो. स्टे. कडलीमुंडा तहसिल कुसुनि, ज़ि. अंगुल राज्य ओडीसा, 2) प्रशांत रामदास गावंडे वय 49 वर्ष. रा. हरणे ले आउट रासा रोड कळंब, 3) हरिओम बाबुलाल ठाकुर वय 33 वर्ष, रा. बालाजी चौक यवतमाळ असे सांगीतले
यातील आरोपी बैस्नव हरा प्रधान हा माहिती प्रमाणे ओडीसा येथून गांजा नावाचा अंमली पदार्थ अवैधरित्या विक्री करीता आलेला असून असुन तिघांना ताब्यात घेवुन त्यांचे जवळील 6 किलो 3 ग्राम कि. 1,20,060 रुपयाचा गांजा व दोन मोबाईल किमंत 20,000 रू. अशा एकूण 1,42,060/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन आरोपीवर NDPS अक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अवधूतवाडी पो. स्टे. सहा. पोलीस निरीक्षक श्रीकांत जिदमवार करीत आहेत.
ही कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक, कुमार चिता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, यांचे मार्गदर्शनात पोनि. सतिश चवरे स्था.गु.शा. , सपोनि मनिष गावंडे, पोउपनि गजानन राजमान्तु, पोलीस अंमलदार से. साजीद, योगेश गटलेचार, अजय होळे, रुपेश पाली, योगेश डगवार, सचिन पुगे, प्रशांत हेडाऊ, रितुराग मेढवे, सुनिल पैठणे, आकाश सहारे, देवेंद्र होले, आकाश सुर्यवंशी सर्व स्था. गु. शा. यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाड़ली.













