टोलेबाज न्यूज :
•मोमीनपुरा येथे 80 किलो गोवंश मास व दोन आरोपीसह 33 हजार रू. मुद्देमाल जप्त.
वणी : शहरात मोमिनपुरा भागात अवैध गोवंश कत्तल करून मास विक्री होत असल्याचे गुप्त माहितीवरून 14 डिसेंबर 025 ला वणी पोलिसांनी टाकलेल्या यशस्वी धाडीत 33 हजाराहून अधिक किमतीच्या 80 किलो गोवंश मास व कत्तलीसाठी वापरले जाणारे साहित्यसह दोन आरोपींना अटक केली आहे.
सविस्तर माहितीनुसार आणि पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून मोमीनपुरा भागात मोहम्मद एजाज अब्दुल अजीज कुरेशी याच्या घरी अवैध गोमास कत्तल करून विक्री करीत असल्याचे माहितीवरून सहा.पो. निरीक्षक निलेश अपसुंदे यांच्या विशेष टीमने मोमीनपुरा येथे मोहम्मद एजाज अब्दुल अजीज कुरेशी याच्या घरी यशस्वी धाड टाकण्यात आली तेथे गोवंश मास विक्री करत असल्याचे आढळून आले.
घटनास्थळावरून गोवंश मास 70 ते 80 किलो अंदाजे किंमत 16000 हजार रू., लोखंडी धारदार सत्तुर चार नग, लोखंडी वजन काटे वजनाची मापे दोन नग, गोवंश मास बारीक करण्याचे जुने इलेक्ट्रिक मशीन ( खिमा मशीन), प्लॅस्टिक कॅरीबॅग असा एकूण 33,060 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी गोवंश मासाचे 5 नमुने रासायनिक तपासणीसाठी घेतले असून मुख्याधिकारी वणी यांच्याशी पत्र व्यवहार करून गोवंश मास नाशवंत असल्याने पंचायत समक्ष त्याचा नाश करण्यात येईल.
यातील आरोपी 1) मोहम्मद एजाज अब्दुल अजीज कुरेशी व 2) मोहम्मद कैसर मोहम्मद अजीज कुरेशी दोन्ही मोमीनपुरा वणी यांच्या विरोधात महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 कलम 5,5 (क ), 9,9 (अ 2 ) सह भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 3 (5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या आदेशाने सहा.पो. निरीक्षक निलेश अपसुंदे,पो. उप. निरीक्षक धीरज गुल्हाने, पो. हवा. बारसागरे, ना. पो. का. विशाल राठोड, पो. का. श्याम घुगे, नंदकुमार पप्पुलवार, गणेश मेश्राम, म. पो. का. पल्लवी बल्की चालक अरविंद यांनी यशस्वी पार पाडली.













