टोलेबाज न्यूज :
वणी :15 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असता गुप्त माहितीवरून नागपूर वरून हैदराबाद हायवेने अवैधरित्या गोवंश जनावरांची वाहतूक करीत असल्याचे माहितीवरून दोन ट्रक सह एकूण 30 लाख रू. मुद्देमाल जप्त केला असून 65 बैलाची सुखरूप सुटका केली.
सविस्तर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा उपविभागात अवैध धंदे विरुद्ध कारवाईदरम्यान पेट्रोलिंग करीत असता गुप्त माहितीच्या आधारे नागपूर वरून हैदराबादकडे गोवंश जनावराची वाहतूक होत असल्याचे माहिती मिळताच ताबडतोब सिंधोडा गावाजवळ सापळा रचला असता पथकाला समजले की सदरचे ट्रक भारत पेट्रोल पंपा जवळील खाली जागेत जय बजरंग बली राजस्थानी धाब्याजवळ असलेल्या पार्किंग मध्ये लपवून असल्याचे निदर्शनास आले.
त्या ठिकाणावरून ट्रक क्रमांक 40 वाय 0951 व एम. पी.04 एच ई 3515 यांची तपासणी केली असता त्या वाहनामध्ये क्ररतेने 65 जिवंत बैल व एक मृत गोरा असे एकूण 66 जनावरे आढळून आले. कोणताही चारापाणी व्यवस्था न करता असुरक्षित क्रूरतेने कोंडून आणल्याचे दिसून आले.
ड्रायव्हर व त्याचे सोबती 1) शेख शहनाज शेख महबूब वय 31 रा. यशोधरा नगर शारदा चौक नागपूर 2) शेख अरबाज शेख कलीम वय 25 रा. भाजी मंडी नागपूर 3) मो. नसरुद्दीन दूरशाहीन कुरेशी वय 28 रा. मदन चौक कामठी नागपूर 4) मो. हसन रोशन अन्सारी वय 26 रा. बनते आनंद कौशल नगर पिली नदी नागपूर, सदर ड्रायव्हरला विचारणा केली असता हा माल 5) वकार कुरेशी रा. कामठी नागपूर याचा असल्याचे सांगितले 66 गोवंशासह दोन ट्रक असा 30 लाख रू. मुद्देमाल जप्त करून यांचे विरुद्ध वडकी पोलीस ठाणे येथे प्राणी निर्दयतेने वागवणे अधि. व प्राणी संरक्षणअधि. व भान्यासं चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वडकी पोलीस करीत आहे.
हि कार्यवाही पो. अधीक्षक कुमार चिंता यवतमाळ, अपो. अधीक्षक अशोक थोरात, यांच्या मार्गदर्शनात पोनि. सतीश चौरे, सपोनि. दत्ता पेंडकर, पोउनीं. धनराज हाके, पो. अमलदार सुनील खंडागळे, सुधीर पांडे, निलेश निमकर, सुधीर पिदुळकर, रजनीकांत मडावी, सलमान शेख यांनी यशस्वी पार पाडली.













