टोलेबाज न्यूज :
वणी : वणी विधानसभा क्षेत्रातील विरकुंड व नवेगाव येथे भूमिगत रस्त्याच्या बांधकामाचे भूमीपूजन सोहळा वणी विधानसभा आमदार संजयभाऊ देरकर हस्ते करण्यात आले. आमदारांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकास कामाचे कौतुक ग्रामस्थांनी केले.
भविष्यातही अशाच पद्धतीने गावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची अपेक्षा ग्रामवासीयांनी व्यक्त केली वणी विधानसभा क्षेत्रातील शहरी व ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून विकास कामाचा सपाटा सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे विरकुंड येथील रस्ता बांधकाम हे त्याचेच एक ठळक उदाहरण असल्याचे ग्रामस्थांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाला सरपंच वर्षाताई मोडावी, उपसरपंच पिनू डांगे, तालुकाप्रमुख संतोष कुचनकर, विलास कालेकर, जय देवकर, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.













