टोलेबाज न्यूज
वणी :यवतमाळ दि. 17 जानेवारी रोजी चोरी /घरफोडीतील अट्टल चोरटा अक्षय दयाराम मसराम वय 28 वर्ष रा. नेताजी नगर यवतमाळ त्याच्या कडून चोरीतील सोन्या चांदीचे दागिने,दुचाकी, टि. व्ही. व सिलेंडर असा 5 लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त करून 9 गुन्हे उघड करण्यास स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाला यश आले आहे.
सविस्तर यवतमाळ उपविभागातील पथक चोरी, घरफोडी, जबरी चोरी,मोटरसायकल चोरी, उघड गुन्हे तपास संबंधित पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहितीच्या आधारे अट्टल चोरटा अक्षय दयाराम मसराम वन विभाग उद्यानाजवळ जाम रोड, यवतमाळ परिसरात एक्सेस दुचाकी मोटरसायकलने चोरीचा माल विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत आहे अशा माहितीवरून पथकाने ताबडतोब घटनास्थळ गाठले व पो.स्टाफ. च्या मदतीने घेराव घालून ताब्यात घेतले
त्याच्या ताब्यातून विविध ठिकाणावरून चोरी केलेले सोन्याचे दागिने वजन अंदाजे 26.05 ग्रॅम किंमत 2,60,500 रू., चांदीचे दागिने वजन अंदाजे 153.04 ग्रॅम किंमत 30,608 रू., सुझुकी कंपनीची एक्सेस मोपेड किंमत अंदाजे 90,0000 रू असा एकूण 3,81,108 रू. मुद्देमाल जप्त करून तब्येत घेण्यात आला तसेच यवतमाळ व पुसद तालुक्यात केलेल्या विविध चोरीतील त्याचे राहते घरून 07 एल.ई.डी.टीव्ही,किंमत अंदाजे 2,03,999 रू. व 1 सिलेंडर किंमत अंदाजे 3,000 रू. असा एकूण किंमत 2,06,999 रू. मुद्देमाल तब्येत घेण्यात आला. पो. स्टेशन अभिलेखाची पाहणी करून पो.स्टेशन अवधूतवाडी येथील 06, लोहारा येथील 02, वसंतनगर येथील 01 असे एकूण 09 गुन्हे उघड करण्यात यश आले आहे.
हि कार्यवाही पो.अधीक्षक कुमार चिंता, अ.पो.अधीक्षक अशोक थोरात, पो.नि.सतीश चवरे, सपोनि. मनिष गावंडे, पोउपनि. गजानन राजमलू व सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या टीमने यशस्वीरित्या पार पाडली.













