•सहा आरोपीसह 1 लाख 4 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त्त
टोलेबाज न्यूज
वणी : वणी पोलिसांनी 18 जानेवारी रोजी वणी हद्दीतील कुंभारखनी क्वार्टर परिसरातील खुल्या जागेत सुरू असलेल्या कोंबडबाजारावर वणी पोलीसांनी यशस्वी धाड टाकण्यात आली या धाडीत 06 जुगाऱ्याना ताब्यात घेऊन 1 लाख 4 हजार रू. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सविस्तर उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांचा आदेशाने पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून कुंभारखनी क्वार्टरच्या मागील बाजूस असलेल्या जंगलसदृश भागात काही इसम कोंबड्यांच्या झुंजीवर पैशांची बाजी लावून जुगार खेळत होते.
या माहितीच्या आधारावर, पोउप. सुयोग महापुरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पंचांसह घटनास्थळी धाड टाकण्यात आली. यातील आरोपी 1) कैलास जगन पेंदोर (वय 30, रा. सुरला, ता. झरी-जामनी) 2) धर्मा किसन परचाके (वय 43, रा. सुरला, ता. झरी-जामनी) 3) उत्तम बोडकाजी ठाकरे (वय 55, रा. वेगाव, ता. मारेगाव) 4) ऋषभ गजानन खुसपुरे (वय 28, रा. कोलगाव, ता. मारेगाव) 5) शंकर शामराव वराटे (वय 32,रा मारेगाव, ता. वणी ) 6) रमेश हिरामन झाडे (वय 40, रा. गणेशपूर, ता. वणी) यांना ताब्यात घेतले.
रोख रक्कम जुगारासाठी वापरलेली ₹ 40,600/-व कोंबड्याच्या पायाला बांधलेली लोखंडी धारदार काती जप्त करून कोंबड्यांचा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलीस स्टेशनमध्ये लिलाव करण्यात आला, ज्यातून ₹ 800/- प्राप्त झाले. अटक केलेल्या आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(ब) आणि १२(क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी यवतमाळ ज़िल्यात कोणत्याही प्रकारच्या अवैध धंदे, शत्रे बाळगणे, आरोपी शोध, गुंगीकारक औषधद्रव्य तस्करीचे समूळ उच्चाटन व्हावे करिता स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेश देण्यात आले असून अवैध दारू,मटका,कोंबडबाजार,घरकुल धारकाची दिशाभूल करून रेती तस्करी जोमात सुरु असून सामान्य जनतेत संतापाचा सूर उमटत असून आता पोलीस अधीक्षक साहेबांकडे जनता कार्यवाहीची मागणी करीत आहे.
या कारवाईमुळे परिसरात अवैध जुगार खेळणाऱ्यांना वणी पोलिसांनी कठोर संदेश दिला आहे.













