दिग्रस शहरात एलसीबी ची धडाकेबाज कार्यवाही “देशी कट्टा जप्त्त ”

January 20, 2026

वणी : यवतमाळ ज़िल्हात दिग्रस शहरात देशी कट्टा /पिस्तूल कमरेला लावून फिरणाऱ्या मो. असिफ मो. अफजल रा. सुभाष नगर ता. दिग्रस अशा युवकाला स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी मोठया शिताफिने अटक केली त्याचेवर 3,25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करून 52 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

19 जानेवारी 026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिग्रस हद्दीत पोट्रोलिंग करीत असताना गुप्त माहिती च्या आधारे दिग्रस ते आर्णी बायपास लगत हिंदू स्मशानभूमी जवळ मो. असिफ मो. अफजल हा संशईत फिरत असल्याचे माहिती वरून पथकाने ताबडतोब दोन पंचासह घटनास्थळ गाठले तेथे दिग्रस ते आर्णी बायपास वरील पुलाचा कठड्यवर संशईतरिते कोणाचीतरी वाट बघत असल्याचे निदर्शनास आले.

त्याच्या कमरेला काहीतरी शस्त्रासारखे दिसून आल्याने त्यास शितफिने ताब्यात घेऊन पंचा समक्ष अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला खोचून एक देशी बनावटी पिस्टल /देशी कट्टा,(अग्निशस्त )मॅगझीनस कि. अंदाजे 50,000 रू. मॅगझीनमध्ये दिसणारे पितळी सदृश जिवंत काडतूस अंदाजे कि. 2000 रू. असा एकूण 52,000 रू. मुद्देमाल मिळून आला. या बाबत विचारणा केली असता शस्त्र बाळगण्याची कोणतीही परवानगी नसल्याचे सांगितले वरून आरोपी विरुद्ध दिग्रस पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हि कार्यवाही पो. अधीक्षक कुमार चिंता, अपो. अधीक्षक अशोक थोरात,पोनि. सतीश चवरे यांचा मार्गदर्शनाखाली सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी पारपाडली.