अज्ञान मुलीवर अत्याचाराचा गुन्हात नराधमास 20 वर्षे सक्त्त कारावासाची शिक्षा “

January 20, 2026

वणी : यवतमाळ ज़िल्हातील आर्णी तालुक्यातील कोपरा गावात समाजाला काळिमा फासणारी अमानुष घटना घडली गावातील एका नराधमाने अल्पयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळून नेऊन सतत लैगिक अत्याचार केल्या या प्रकरणी अतिरिक्त्त ज़िल्हा व सत्र न्यायालय दारव्हा यांनी आरोपीस 20 वर्षाची सक्त्त मजुरीची शिक्षा दिली.

माहितीनुसार पो. स्टे. आर्णी येथील दाखल अपराध क्र. 346/2021 कलम 363 भा.द.वि. मध्ये ग्राम कोपरा येथील अल्पवयीन मुलगी अ.ब.क.वय 14 वर्षे हिला 14/05/2021 रोजी दुपारी 11 वाजता आरोपी शाम माणिक ढोले (वय 24 वर्षे )रा. कोपरा ता. आर्णी याने पीडित अल्पयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले तसेच तिला मौजा बनवाडी ता. कोरेगाव सातारा येथे भाड्याची खोली घेहून राहत असताना वारंवार लैगिक अत्याचार केला .

सदर गुन्ह्याचा तपास पो.निरीक्षक पो.स्टे.आर्णी यांनी पीडित मुलगी व आरोपीचा शोध घेहून गुन्ह्यात परिस्थितीजन्य पुरावे, लेखी पुराचे, तोंडी पुरावे गोळा करून आरोपी विरुद्ध कलम 363,366,376 (2),376 (ज) (न) भा.द.वि. सहकलम 4,6 पोक्सो अन्वये दोषारोप पत्र अतिरिक्त्त ज़िल्हा व सत्र न्यायालय दारव्हा येथे दि.12/07/2021 रोजी दाखल केले. न्यायालयाने या प्रकरणात एकूण 08 साक्षीदार तपासून त्यामध्ये पीडित व ईतर साक्षीदाराची साक्ष ग्राह्य धरून आज दि. 20 जानेवारी 2026 रोजी सदर प्रकरणाचा निकाल दिला.

ज्यामध्ये शाम माणिक ढोले रा. कोपरा ता.आर्णी याला भादवि चे कलम 363 मध्ये 03 वर्ष शिक्षा व 5,000 रू.दंड, भादवि चे कलम 366 मध्ये 05 वर्ष शिक्षा व 5,000 रू.दंड, भादवि चे कलम 376 (2) मध्ये 10 वर्ष शिक्षा व 10,000 रू.दंड, भादवि चे कलम 376 (2)(ज )(न )मध्ये 10वर्ष शिक्षा 10,000 रू. दंड तसेच बाल लैगिक अत्याचार कायदा कलम 4 मध्ये 20 वर्षे शिक्षा व 25,000 रू.दंड, बाल लैगिक अत्याचार कायदा कलम 6 मध्ये 20 वर्षे शिक्षा व 25,000 रू.दंड अशी शिक्षा वि.ज़िल्हा व सत्र न्यायाधिश संजीवकुमार नरवाडे साहेब यांनी दिली.

या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे ऍड. अंकुश एस.देशमुख यांनी बाजू मांडली गुन्हाचा तपास पो.उप.शिवराज पवार लेखनिक पोशि विशाल गावंडे यांनी केला कोर्ट पैरवी सफौ गजानन भगत यांनी काम पाहिले.