टोलेबाज न्यूज
वणी : यवतमाळ ग्रामीण हद्दीत मनदेव येथे दि. 04/07/2021 सायंकाळी 7 वाजता दरम्यान आरोपी विनोद दादाराव खडके वय 35 वर्षे रा.मनदेव हा ज़िल्हा परिषद शाळेच्या वरचा मजल्यावर बसून असलेल्या वडील दादाराव खडके यांना जेवण करण्यासाठी बोलवण्यास गेला असता वडिलांने जेवण करण्यास नकार दिल्याने रागाचा भरात विनोद याने वडील दादाराव यास रोडवर ओढत आणून लाकडी झीलपीने डोकयावर वार करून लाथाने छातीवर व पोटावर मारहाण करून जीवे ठार मारले.
व आई सौं जयवंती दादाराव खडके हिला सुद्धा शिवीगाळ व थापडाने मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली सौं जयवंती दादाराव खडके यांनी पोलीस स्टेशन यवतमाळ ग्रामीण येथे गुन्हा नोंद करून आरोपी विनोद यास तात्काळ अटक करून या गुन्हाचा तपास करून तत्कालीन तपास अधिकारी पोलीस निरीक्षक किशोर बळीराम जुनघरे यांनी हे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट केले होते.
न्यायालयाने या गुन्ह्यातील साक्षपुराव्यानंतर प्रत्यक्ष दर्शी साक्षीदार डॉक्टर, फिर्यादी, पंच, व तपास अधिकारी यांचे साक्षीतून व सिद्ध केलेल्या दस्तऐवजाचे आधारे दि. जानेवारी 026 रोजी मा न्यायालयाने आरोपी विनोद दादाराव खडके याचे विरुद्ध भादवि कलम 302 मध्ये जन्मठेपेची शिक्षा व 1,000 रू. दंड आणि दंड न भरल्यास 6 महिण्याच्या सक्षम करावासाची शिक्षा ठोठावली आहे.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोनि.किशोर बळीराम जुनघरे यांनी केला व सरकारी पक्षाचा वतीने सहाय्यक सरकारी वकील मंगेश गंगलवार यांनी काम पाहिले व साक्षीदार पडताळणी पोस्टे.यवतमाळ ग्रामीण चे पोनि. सुनील नाईक तसेच कोर्ट पैरवी अधिकारी मपोहवा नीता खडसे यांनी साक्षीदारास मार्गदर्शन केले.













