वाहतूक शिपायाने बस मधील प्रवाशाचे वाचविलेप्राण ते बनले “देवदूत “

January 23, 2026

वणी : “देव तारी त्याला कोण मारी ”अशीच घटना यवतमाळ ज़िल्हातील वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी निलेश झाडे हे स्टेट बँक चौक येथे कर्तव्यावर हजर असताना धामणगांव ते यवतमाळ बस मध्ये एका प्रवाशाला हार्ट अटॅक आला असता निलेश झाडे यांनी तत्परता दाखवून त्याप्रवशाला दवाखान्यात नेऊन त्याचे प्राण वाचविले.

माहितीनुसार दि.1जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता दरम्यान निलेश झाडे स्टेट बँक चौकात कर्तव्यावर हजर असता धामणगांव ते यवतमाळ बस मधील कंडक्टर यांनी सांगितले कि बस मधील प्रवासी रोशन गणेश बुटके (वय 25 वर्षे)रा.कवठा ता.पुलगाव ज़िल्हा वर्धा यांना हार्ट अटॅक आला आहे.

त्याना तातडीची मदत करा तेव्हा निलेश झाडे यांनी क्षणाचाही विलंब न करता बस मधील प्रवाशी रोशन यास ऑटो मधे बसवून त्वरीत सरकारी हॉस्पटल यवतमाळ येथे भरती केले डॉक्टराणी लगेच उपचार करून रोश्नचे प्राण वाचविले तेव्हा डॉक्टराणी सुद्धा निलेशचे कौतुक केले सांगितले कि तुम्ही पेशंटला वेळेवर आणल्यामुळे त्याचे प्राण वाचले या कार्याबद्दल पेशंटचे मित्र व नातेवाईक यांनी ट्रॅफिक पोलीस निलेश झाडे यांनी तत्परता दाखवून प्रवाशी पेशंट यास दवाखान्यात दाखल केल्या बद्दल आभार मानून अभिनंदन केले. 

या कार्याची दखल महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी दखल घेऊन ट्रॅफिक पोलीस अंमलदार निलेश झाडे यांचे सोबत पोलीस अधीक्षक कार्यालय यवतमाळ येथे कार्यालयातून व्हिडिओ कॉल वर बोलणी करून केलेल्या कार्याची  प्रशंसा करून कौतुकाची पाठीवर थाप ठेवली आणि बक्षीसपत्र देऊन गौरविण्यात आले .