साई मंदिर जवळ अपघात वाहणावर गुन्हा दाखल

January 23, 2026

वणी :वणीतील साई मंदिर समोर भरधाव वेगाने वाहन चालऊन मोटारसायकल स्वारास धडक देऊन गंभीर जखमी केले प्रकरणी वणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर दि. 9 डिसेंबर 2025 रोजी सुरेशराव बोढाले हे त्याची मोटारसायकल वाहन क्र. M.H.29 BJ 6779 गाडीने साई मंदिर येथे दर्शना साठी जात असताना आरोपीने वाहन क्र. M.H.29 CA 3504 भरधाव वेगाने चालऊन सुरेश बोढाले यांचा वाहनाला जबर ठोस मारून अपघात केल्याने गंभीर दुखापत होऊन झाखमी झाले आहे.

त्याचा मुलाने स्वप्नील सुरेशराव बोढाले वय 40 वसंत विहार वणी यांचा फिर्यादी वरून वाहन चालका विरुद्ध 22 जानेवारी 026 रोजी उप क्र. 41/26 कलम 281,125 (ब ) भान्यास गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

निष्काळजीपणे भरधाव वेगाने वाहन चालवीनाऱ्याचा संख्या वाढत चालली असून सामान्य नागरिक या घटनेचे बळी पडत आहे अशा घटना सतत वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.