टोलेबाज प्रतिनिधी | रवि घुमे
तालुक्यातील वेगाव येथे युवकाने कीटनाशक प्राशन करून मृत्यूला कावटाळल्याची घटना ता.16 ला संध्याकाळी 6 वाजेदरम्यान घडली. राहुल शंकर मेश्राम (23) आहे.
सविस्तर बातमी अशी की राहुल हा रोजमजुरी करून उदरनिर्वाह करत होता त्याने स्वतःच्या घरीच कीटक नाशक प्राशण केले ही बाब कुटूंबीयांच्या लक्षात येताच राहुलला उपचारार्थ ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे दाखल केले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने इतरत्र नेण्याचा सल्ला दिला.मात्र वाटेतच त्याचा श्वास बंद झाल्यामुळे त्याला परत मारेगाव ग्रामीण रुग्णालयात नेले असता तपासाअंती डॉक्टरांनी मृत घोषित केले. दुसऱ्या दिवशी 17 ऑगस्ट ला शवविच्छेदन करून वेगांव येथील श्मशान भूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे













