•उद्धव ठाकरे यांचे आदेशानुसार तहसीलदारांना निवेदन
टोलेबाज न्युज वार्ता :
रवि घुमे : मारेगाव: सरकारला मनाप्रमाणे मोकळीक मिळावी व लोकशाहीवादी अहिंसक चळवळ दडपण्यासाठी लागु केलेला जन सुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे तालुका शाखा मारेगावच्या वतीने ता. १० सप्टेंबर ला मारेगावात निदर्शने आंदोलन करण्यात आले आहे.
नक्षलवादाच्या नावाखाली लोकशाहीचा गळा घोटण्यासाठी हे विधेयक असुन व्यक्ती आणि संघटना असा धूसर उद्देश ठेवून सरकारला मनाप्रमाणे कारवाईची मोकळीकता मिळावी अशी या कायद्यात तरतुद असुन हा उद्देश हाणुन पाडण्यासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्य व्यापी आंदोलन करण्यात आले आहे.
याचाच भाग म्हणुन मारेगावात निदर्शने आंदोलन करण्यात येवुन तहसिलदार उत्तम निलावाड यांच्या मार्फत सरकारला निवेदन पाठविण्यात आले आहे.
यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात येवुन निषेध करण्यात आला आहे.
शेतकरी, कामगार, कष्टकरी यांच्या संघर्षाला गुन्हा ठरविणारा हा कायदा रद्द झाला पाहीजे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनावर तालुका प्रमुख पुरुषोत्तम बुटे, सचिव दिवाकर सातपुते,उप तालुका प्रमुख विजय अवताडे,उप तालुका प्रमुख देवा बोबडे, उपतालुका प्र.जानराव पिपळकर,संपर्क प्रमुख सचिन पचारे, विधानसभा संघटक मधुकर वरडकर , नगराध्यक्ष डॉ.मनिष मस्की, अभय चौधरी, शरद ताजणे, विभाग प्र.गुरुदास घोटेकार, विभाग प्र.मनोज वादाफळे,मनोज मत्ते,पांडुरंग ढुमणे,अविनाश भाजपाले,समाधान पवार,इत्यादी शिवसैनिकांच्या सह्या आहेत.













