बारमध्ये महिलांचा तांडव…. बारमालकासह मॅनेजरचा डोळ्यात मिरची पावडर फेकून मारहाण.

September 13, 2025

प्राप्त माहिती नुसार मनोज रामराव उरकुडे (४१) हे शिवाजी चौक वणी येथील रहिवासी असून यांचे वरोरा रोडवर न्यू ज्योती रेस्टॉरन्ट व बार आहे. शनिवारी दिनांक 13 सप्टेंबर रोजी सकाळी ते नेहमीप्रमाणे बारमध्ये गेले. दुपारी १. ३० वाजताच्या सुमारास ८ ते १० महिला दोन ऑटोमधुन बार समोर आल्या. हाती प्लास्टीक पाईप व लाकडी दांडा घेऊन ही महिलांची टोळी अचानक बारमध्ये शिरली. काही महिला बार काउंटरवर तर काही महिला वरच्या माळ्यावर असलेल्या बार मालकाकडे गेल्या. त्यांनी बार मालकाच्या डोळ्यात मिरची पूड फेकली व त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तर काउंटरजवळील महिलांनी मॅनेजर आशिष खाडे याला शिविगाळ करीत मारहाण केली.