विजेचा लपंडावाने कुंभा परीसरातील नागरिक त्रस्त.

September 17, 2025

रवि घुमे : मारेगाव.
विद्युत वितरण विभाग मारेगाव च्या तालुक्यातील कुंभा परिसरात सतत खंडित वीज पुरवठा सुरु असून या खंडित विजपूरवठ्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असून ग्रामस्थ्यांच्या समस्या तातडीने सोडवा अशी मागणी सरपंच अरविंद ठाकरे यांनी विद्युत वितरण विभागासह तहसीलदारांना निवेदनातून केली.
संदर्भात आधीही अनेक वेळा संबंधित कार्यालयाकडे तक्रारी व निवेदनं दिली असूनही परिस्थितीत काहीही सुधारणा होतांना दिसली नाही.
यामुळे शेतीसहीत दैनंदिन कामांमध्ये अडथळा निर्माण होत असून शेतकऱ्याचे विजेवर चालणारी उपकरणे
निकामी झाली आहे.
यांसारख्या समस्या निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या समस्या लक्ष्यात घेऊन कुंभाचे जागरूक सरपंच अरविंद ठाकरे आपल्या समर्थकासह आक्रमक भूमिकेत वीज वितरण कंपनीत अधिकाऱ्यांना या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी धारेवर धरले.

कुंभा सर्कलसाठी कायमस्वरूपी लाइनमन व हेल्पर ची मागणी
निवेदनातून केली आहे कारण या भागात वारंवार वीज खंडित
झाल्याने अधिकारी वर्गाला संपर्क करणे कठीण झाले, त्यांचे मोबाईल स्विच ऑफ येणे,सततच्या खंडित विजपूर्वठ्याने शेतकऱ्यांसहीत वीध्यार्थी, व्यवसायिक अडचणीत आल्याचा आरोप अरविंद ठाकरे यांनी निवेदनात नमूद केला आहे.
पावसाळ्यात आपत्कालीन सेवा सुरू करण्याची मागणी ही निवेदनातून केली आहे
वादळी वारा पाऊस या वेळेत विजे संबंधित निर्माण झालेल्या समस्या वर तातडीने उपाययोजना व दुरुस्ती करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्याची मागणी निवेदनातून केली

कुंभा या भागात गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. काही वेळा वीज १२ ते २४ तास खंडित असते. अचानक जाते व अनेक वेळा रात्रीच्या वेळीही वीज बंद होते. यामुळे परिसरातील नागरिकांना, विद्यार्थी वर्गाला, तसेच व्यावसायिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात या आधीही गावकऱ्यांनी याबाबत संबंधितांना तक्रार नोंदवली आहे, परंतु अद्याप कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. तसेच त्यामुळे ११ के. व्ही. व ३३ के. व्ही. सबस्टेशन सुरु करण्यात यावे अशीही मागणी केली आहे. कुंभा येथील रहिवाशासह सरपंच अरविंद ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अभियंता पांढरकवडा कार्यालय व म.रा.वि.वि.मारेगाव आणि तहसील कार्यालयावर आपल्या ताफ्यासह जाऊन तहसीलदारांना निवेदन दिले.
Box
हप्त्याभरात विजे संबंधित समस्या निकाली काढण्याचा अल्टिमेटम यावेळी देण्यात आला.
मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशाराही सरपंच अरविंद ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिला.
निवेदनाची दखल न घेतल्यास इथून पुढे पूर्ण गावात कोणीही वीज बिल भरना करणार नाही, असा ठराव ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात येईल असेही सरपंच सरपंच अरविंद ठाकरे यांनी
सांगितले.