देशी दारू दुकानाच्या विरोधात कायर येथील महिला आक्रमक

September 17, 2025

वणी : तालुक्यातील कायर येथे ग्रामपंचायतीचा ना-हरकत घेता देशी दारूदुकान विनापरवानगी जागा बदलून थेट दुकान दुसऱ्या वार्डात थाटल्याने, या विरोधात गावातील संतापलेल्या नागरिकांनी आज बुधवारी दिनांक 17 रोजी या दुकानावर भव्य मोर्चा काढून दारू विक्री बंद करण्याची जोरदार घोषणाबाजी करत मागणी केली.

कायर येथील बाबापूर रस्त्यावरील दारुच्या दुकानाचे काही दिवसांआधी मुकुटबन रोडवर स्थानांतर झाले आहे. याबाबत ग्रामपंचायतीची ना हरकत न घेता दुकान सुरू करण्यात आल्याचा आरोप गावाकऱ्यांनी केला आहे. या विरोधात गावाकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्याना निवेदन दिले. परंतु, गावकऱ्यांच्या निवेदनाला प्रशासन केराची टोपली दाखवत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे.

आज बुधवारी ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव घेतला असून दारू विक्री सुरूच असल्याने या विरोधात येथील महिला आक्रमक होत थेट दुकान बंद करण्याची मागणी केली.