राष्ट्रीय लोक अदालत मध्ये 127 प्रकरणाचा निपटारा, 1,60,26,079/- रुपरांची वसुली

September 18, 2025

वणी : मा. दिवाणी न्यायालय,व.स्तर, वणी येथे राष्ट्रीय लोक अदालतचे दिनांक 13 सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. सदर राष्ट्रीय लोक अदालत मध्ये पॅनल नं.1 पॅनल प्रमुख श्री.पि.एस. जोंधळे साहेब, दिवाणी न्यायाधिश, वरिष्ठ स्तर, वणी तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती, वणी, पॅनल नं.2. श्री. शहाजी दत्तराव भोसले साहेब, सह दिवाणी न्यायाधिश व न्यायदंडाधिकारी, (प्र.श्रे.) वणी, पॅनल नं. 3 मध्ये श्री.ए.बी. बिरादर साहेब, 2 रे सह दिवाणी न्यायाधिश, क. स्तर व न्यायदंडाधिकारी प्र.श्रे.वणी, तसेच पॅनल मेमेंबर श्री.धनंजय आसुटकर अॅडव्होकेट, आणि पॅनल मेंबर कु.शिरीन एम. पठाण, अॅडव्होकेट वणी उपस्थित होते.

सदर राष्ट्रीय लोक अदालत मध्ये बॅंक व पत संस्थेची दाखल पुर्व एकुण 60 प्रकरणाचा निपटारा करण्यात येवुन बॅंकेस रक्कम रु. 85 लाख 25 हजार 522 पाचशे बाविस रुपये वसुल करण्यात आले. मनी रिकव्हरी चे 03 प्रकरणाचा निपटारा करण्यात येवुन 7 लाख 60 हजार रुपये वसुल करण्यात आले.
तर चेक बाउन्स चे 13 प्रकरणाचा निपटारा करण्यात आला यामध्ये 67 लाख 20, हजार 757 रुपये ची रक्कम वसुल करण्यात आली. त्यातील चेक बाउन्सची 02 प्रकरणे 05 वर्षा वरील होती. किरकोळ गुन्ह्यांचे एकुण 51 प्रकरणाचा निपटारा करण्यात आला यामध्ये 19 हजार 800 रुपयेची वसुली करण्यात आली. अश्या प्रकारे एकुण 127 प्रकरणाचा निपटारा करण्यात येवुन एकूण रक्कम 1 एक करोड 60 साठ लाख 26 सव्वीस हजार 79 एकोणअंशी रुपयाची वसुली करण्यात आली.

सदर लोक अदालती मध्ये बहुसंख्येने पक्षकार, वकील, पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तसेच न्यायालयीन न्यायाधीश तसेच कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय लोक अदालतचे यशस्वीते करिता अथक परिश्रम घेवून सदर कार्यक्रम यशस्वी केले.