जय जय रामकृष्ण हरी,नगाजी महाराजांच्या जय घोषाने दुमदूमली मारेगाव नगरी

September 19, 2025


“जाता पंढरीसी सुख वाटे जीवा। आनंदे केशवा भेटताचि।।”

ही संत सेना महाराजांनी लिहिलेल्या अभंगातील ओळ.
या ओळींचा अर्थ आहे की पंढरपूरला जाताना जीवांना खूप आनंद होतो आणि विठ्ठल (केशव) यांना भेटल्याने त्यांना खूप सुख मिळते. पंढरपूरची महानता आणि तिथे मिळणारे सुख व्यक्त करतात.

हो! अगदी योग्यच लिहिलं महाराजांनी,
पण पंढरीचं सुख हे नगाजी महाराजांच्या चरणाशीच तर नाही ना ह्या ध्येय्याने झपाटलेला एक जगन्नाथ नगरी वेगाव येथे वास्तव्यास असलेला तरुण तेजस मांडवकर सलून व्यावसायिक गत दोन वर्षांपासून नगाजी महाराजांना शरण गेला आणि गत वर्षी पासून इंदिरा एकादशीला मारेगाव येथील नगाजी महाराज देवस्थान च्या नियोजित जागेवर श्रद्धापूर्वक तन मन धनाने कार्यक्रम घेतो आहे.
नाभिक बांधव एकत्र करून वैयक्तिक तो भजन पूजा आरती करून अन्नदान करतो. कार्यक्रमासाठी मोठया संखेने नाभिक समाजबांधव उपस्थित होते.
आणि हनुमान मंदिर येथे आरती करून दिंडीची सांगता करण्यात आली.

न भूतो अशा पारंपरिक वारकरी हरिपाठ दिंडीने वेधले शहर वाशियांचे लक्ष
पारंपरिक वारकरी संप्रदायाची दिंडी धोतर टोपी खांद्यावर शेला आणि टाळ सोबत मृदंगाचा कर्णमधुर नाद हे दिंडीचे वैशिट्य लक्षनीय होते. रस्त्यावरून ये -जा करणारे क्षणभर थबकुन आपसूकच स्वतःच्या भ्रमनध्ववनीत चित्रीकरण करतांना दिसत होते.
ना ध्वनी प्रदूषण ना वाहतुकीला खोळंबा असा अद्वितीय सोहळा संत नगाजी भक्तांनी आगळ्या वेगळ्या स्वरूपात संपन्न केला.