पोलीस स्टेशनमध्ये दुर्गा उत्सव मंडळांच्या अध्यक्ष, सदस्य आणि नागरिकांची बैठक

September 21, 2025

वणी : आगामी सण-उत्सवांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून वणी पोलीस स्टेशनमध्ये आज (दिनांक २०/०९/२०२५) सकाळी ११:०० ते १२:३० या वेळेत दुर्गा उत्सव मंडळांचे अध्यक्ष, सदस्य आणि प्रतिष्ठित नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक श्री. गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली.बैठकीमध्ये, दुर्गा विसर्जन मिरवणूक पारंपरिक पद्धतीने काढण्याबाबत आणि डी.जे. (DJ) चा वापर टाळून पारंपरिक वाद्यांचा उपयोग करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, खालील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले:• दुर्गा विसर्जन मिरवणुकीत मंडळाच्या जास्तीत जास्त स्वयंसेवकांनी सहभाग घ्यावा.• मिरवणुकीत कोणीही नशेत किंवा मद्यपान करून सहभागी होऊ नये.• दिलेल्या मार्गाचे (Route) आणि वेळेचे तंतोतंत पालन करावे.• विसर्जन घाटावर देवीचे विसर्जन करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घ्यावी.• प्रत्येक दुर्गा मंडळाने नवरात्री उत्सवात मंडपात एक स्वयंसेवक पूर्णवेळ हजर ठेवावा.• नवरात्री उत्सवात कोणत्याही मंडळाने आक्षेपार्ह पोस्टर किंवा बॅनर लावू नये.या बैठकीत, गावातील कोणताही कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन मान्यवरांनी केले. तसेच, सर्व दुर्गा मंडळ अध्यक्ष आणि सदस्यांना डी.जे. मुक्त मिरवणुका काढण्याचे आणि विसर्जन शांततेत पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले.या बैठकीला सुमारे १५० ते १७५ अध्यक्ष, सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते.