मारेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा,

September 22, 2025

राज्यासह तालुक्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच कर्जमाफी झाली नाही. त्यात शेतातील पीक देखील हातातून गेले आहे. त्यामुळे बळीराजा अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी काँग्रेसने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून मागणी केली आहे.

राज्यसह मारेगाव तालुक्यालाही अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून सोयाबीन, कापूस या पिकांचे नुकसान झाले आहे. तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मारेगाव तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून मागणी केली करण्यात आली.

शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम धोक्यात येण्याची शक्यता आहे. बळीराजा आस लावून बसला असून तालुक्यातील शेतकरी निराश झाले आहे. त्यांना तातडीने मदतीची गरज आहे. तालुक्यातील पंचनामे लवकर पूर्ण करून ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदतीची घोषणा करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद बालकल्याण सभापती अरूणाताई खंडाळकर, तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गौरीशंकर खुराणा, तुळशीराम कुमरे, अंकुश महापुर, विजय घोटेकर, आकाश बदकी, यादव काळे, माया पेंदोर सह तालुक्यातील काॅग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येमध्ये या उपस्थित होते.