टोलेबाज न्युज वार्ता : रवि घुमे, मारेगाव
पोलीस स्टेशन मारेगाव अंतर्गत येत असलेल्या जळका येथील बालसदन येथून एक मुलगा बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर बाबीची तक्रार पोलीस स्टेशन मारेगाव येथे करण्यात आली आहे.
रुद्रा आकाश राठोड वय ९ वर्ष रा. खडबडा मोहल्ला, रंगनाथ नगर, वणी,जिल्हा यवतमाळ (ह. मु. आनंद बाल सदन, जळका ) असून तो दिनांक २२ सप्टेंबर रोजी सकाळी ६. ४५ वा. बाल सदन गृह येथे हजर होता त्यानंतर कुणाला काहीच न सांगता बाल सदन मधून निघून गेला आहे.अशी तक्रार मोहन महादेव उईके , काळजीवाहक आनंद बाल सदन जळका यांनी पोलीस स्टेशन मारेगाव येथे दिली आहे.
त्यानुसार वर्णन – उंची ३ फूट ५ इंच, रंग सावळा असून त्याने पांढरा शर्ट -निळा फुल पॅन्ट परिधान केला असून त्याला मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णनाचा मुलगा आढळ्यास पोलीस स्टेशन मारेगाव येथे कळविण्यात यावे असे आवाहन पोलिस निरीक्षक श्याम वानखेडे , पोलीस जमादार किसन सुंकुलवार यांनी केले आहे













