5,84,140 रुपयाचा मुद्देमाल जप्त
टोलेबाज न्युज वार्ता :अभय गावंडे, यवतमाळ
पांढरकवडा : पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ता. 22 च्या सायंकाळी पाटणबोरी येथे जाकपॉट वाईनबारच्या मागे रूम मधे सुरु असलेल्या जुगारावर छापा मारत 5 लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
प्राप्त माहिती अशी की,राष्ट्रीय महामार्ग 44 वर पाटणबोरी गावानाजिक असलेल्या जॅकपॉट वाईन बारच्या मागे असलेल्या बंद खोलीत जुगार खेळत असलेल्या 20 जुगारांना व विनापरवाना अवैध चालवत असलेल्या अड्डा मालक शेख आसिफ शेख चांद याच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार कारवाई केली.
सदर कारवाईत 20 जुगारांना ताब्यात घेण्यात आले असून आरोपी ओम संजय शिर्तावार हा फरार आहे. घटनास्थळावरून जुगार डावावर रु. 43,000 रोख, 18 मोबाईल नग,तास पत्ते 24 नग,2 दुचाकी वाहन,20 नग खुर्च्या, 5 नग टेबल असा एकूण अंदाजे 5,84,140 रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात पांढरकवडा पोलिसांना यश आले.
अटकेत असलेले शेख आसिफ शेख चांद पारवा, शेख नासिर शेख मदार आदिलाबाद तेलंगणा,शेख रउफ शेख उस्मान आर्णी,शेख रहमान शेख अब्दुल घाटंजी,राजू नानाजी वाघ घाटंजी,सद्दाम रज्जाक शेख घाटंजी,अंकुश केशव नागेकर तिवसाळा ता. घाटंजी,दत्ता लक्षमन कापडे कोदुरी ता. केळापूर,सतिष पिराजी अंडेवार आदिलाबाद,मालारेड्डी शेकन्ना पानोजवार पाटणबोरी, पंकज रंजनराव भोयर घुबडी ता. केळापूर, नामदेव जीवन नव्हाते घाटंजी,रुपेश भाऊराव भोयर खापरी ता. घाटंजी,राजेश शिवप्रसाद धूत भुक्तापूर आदिलाबाद,आशिष संतोष करनमावर मांडवी ता. जारीजामणी,रामकिसन माधव किनाके टेम्भी ता. केळापूर, राजेश उद्धव बोबडे घाटंजी, उदय महेश गुप्ता घाटंजी, फिरोज अयुब खान आर्णी, आकाश रामराव मोहिते पारवा.
सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक कुमार चिंता यवतमाळ, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बंसल पांढरकवडा यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे यांचे नेतृत्वात सपोनी सागर पेंढारकर पोहेकॉ गजानन पत्रे पोहेकॉ राम राठोड, नापोकॉ किशोर आडे,पोशी विवेक ध्यावर्तीवार पोशी सूर्यकांत गीते यांनी पार पाडली. पुढील तपास सपोनी सागर पेंढारकर पो. स्टे. पांढरकवडा हे करत आहे.













