टोलेबाज वार्ता पत्र :
वणी:सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा श्री जैताई मंदिर नगर, वाचनालयाचे अध्यक्ष माधवरावसरपटवार ह्यांना सन २०२५चा जैताई मातृगौरव पुरस्कार प्राप्त झाला. याच सोहळ्यात यांच्यावरील“माझे जीवनगाणे” ह्या पुस्तकाचेथाटात प्रकाशन झाले. दैनिक तरुण भारतचेमुख्य संपादक शैलेस पांडे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, ख्यातनाम बांधकामव्यावसायिक आशुतोष शेवाळकर, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नागपूर येथील प्रसिद्धडॉ. सौरभ बरडे, विद्यावाचस्पती स्वानंद पुंड, पुस्तकाचे संपादक सुनील इंदुवामनठाकरे आणि सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया प्रामुख्याने उपस्थित होते.
या पुस्तकाला ख्यातनाम साहित्यिक तथा पत्रकार शैलेश पांडे ह्यांची प्रस्तावना आहे. त्यांनी त्यावर भाष्य केले. संपादक सुनील इंदुवामन ठाकरे ह्यांनी या पुस्तकाची निर्मितीप्रक्रिया विषद केली. ही शैलेश सरपटवार, शर्वरी सरपटवार, राम बीडकर आणि शिल्पा बीडकर ह्यांची निर्मिती असूनप्रकाशक विदर्भ साहित्य संघ, वणी शाखा आहे. मुखपृष्ठ सागर मुने ह्यांचं तर मलपृष्ठ गुरुदत्त बीडकर ह्यांचं आहे. आतील पेन्सील रेखाटन हर्षदा सरपटवार ह्यांचं आहे.मांडणी व सजावट मंगला बक्षी ह्यांची असून निर्मिती प्रमुख भारती सरपटवार आहेत.
प्राचार्यराम शेवाळकर, संजय इंदुरकर, ग्यानचंद भंडारी, अरुणकुमार खैरे, डॉ. श्रीकांतगोडबोले, कोल्हापुरचे राम देशपांडे आदींचे यात लेख आहेत. तसेच महाकवी सुधाकर गायधनी, वनराईचे गिरीश गांधी, प्राचार्य शिरीषदादा कवडे, ना. गो. थुटे, मधुकर सवरंगपते, आशुतोष अडोणी, ब. ना. एकबोटे, वीणा हरदास, प्रा. प्रणिता भाकरे, विनयकोंडावार, प्रा. रवींद्र साधू, ना. ना.देशपांडे, नरसिंह बेलसरे, दादा घाटोड, नारायण जोशी, डॉ. लक्ष्मण जिवने, केशवआवारी, मीनाक्षी गोरंटिवार आदिंच्या पत्रव्यवहारांचा यात समावेश आहे.
डाखरे गुरुजी, गरुदत्त आणि देवदत्त बिडकर, सोबतच गौतम सुत्रावे, नीलकृष्ण देशपांडे, स्मिता गोरंटिवार,जया मीनल अनिल रोहणकर, सुभाष व सुनीता देशमुख आदींनी काव्यांतून भावना व्यक्तकेल्या आहेत. कार्यक्रम संयोजन सागर मुने ह्यांनी केलं. यावेळी बहुसंख्यस्नेही, रसिक उपस्थित होते. प्रास्ताविक भूमिका प्रा.स्वानंद पुंड यांनी मांडली.आभार प्रा. चंद्रकांत अणे ह्यांनी मानलेत.
०००००००००००००००००००













