•तालुका प्रमुख विशाल किन्हेकर यांचा वाढता आलेख
टोलेबाज वार्ता पत्र : रवि घुमे : मारेगाव
हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व यांच्या विचारांशी एकनिष्ठ असलेले पक्षाचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने दि.२८ सप्टेंबर रविवारला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना शिंदे गटाचे उपशहरप्रमुख व शहर विभाग प्रमुख पदग्रहण सोहळा पदग्रहण सोहळा यवतमाळ येथील समर्थ हाँटेल आर्णी रोड येथे मंचावर पश्चिम विदर्भ समन्वयक पराग पिंगळे, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख हरिहर लिंगणवार, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख श्रिधर मोहड, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख गजानन डोमाळे, जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख राजूदास जाधव, जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख यशवंत पवार व शिवसेना उपनेते माजी आमदार अमरावती व शिवसेना जिल्हा निरीक्षक यवतमाळ ज्ञानेश्वर धाणे पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आला .
सदर कार्यक्रमात मारेगाव शहरासाठी शहर उपप्रमुख व शहर विभाग प्रमुख यांची तालुका प्रमुख विशाल किन्हेकर व मारेगाव शहर प्रमुख विजय मेश्राम यांच्या सान्निध्यात निवड करण्यात आली असून प्रविण साईबाबा बोबडे यांची १ ते ९ प्रभाग क्रमांक साठी उपशहर प्रमुख तर गणपत चोखाजी वाढई यांची १० ते १७ प्रभाग क्रमांक साठी मारेगाव उपशहरप्रमुख पदी निवड करण्यात आली असून विभाग प्रमुख म्हणून १,२,३,४ या प्रभाग करिता मोहन दौलत किन्हेकार ५,६,७,८ या प्रभाग क्रमांक करिता विठ्ठल नानाजी गेडाम प्रभाग क्रमांक९,१०,११,१२ करिता उमेश उत्तम उलमाले व १३,१४,१५,१६ व १७ प्रभाग क्रमांक करिता आनंद पद्माकर नक्षणे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडी शहरात किंवा बुथ वर पक्ष संघटन वाढविण्यासाठी करण्यात आली असून यांचा पदाचा काळ हा एक वर्षासाठी असून यांच्या कार्यकाळातील कार्य पाहून पक्षश्रेष्ठी पुढील पदोन्नतीसाठी विचार करणार आहे.
या निवडी बद्दल सर्व शिवसेना शिंदे गटाचे नेते, पदाधिकारी,व कार्यकर्ते यांनी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.













