उमरखेडात घरफोडी मालिका उघडकीस; दोन चोरटे जेरबंद, २ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

October 3, 2025

उमरखेड शहर व परिसरात झालेल्या घरफोड्यांच्या मालिकेचा अखेर उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या डिटेक्शन बेंच (डीबी) च्या कसून तपासातून दोन घरफोड्या करणाच्या आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या कडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल असा एकूण २ लाख ८३ हजार २६० रुपयांचा मू्देमाल जप्त करण्यात आला आहे.

फियादी सौ. रेखा दत्ता खरुसकर (रा. महात्मा फुर्ले वार्ड, उमरखेड) यांच्या घरात १० जुले रोजी मध्यरात्री चोरट्यांनी प्रवेश करून १० हजार रुपये व ६ ग्रेमचे सोन्याचे मंगळसूत्र चोरी केले होते, या प्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल तपासणी व सायबर सेलच्या तांत्रिक विश्लेषणातून पोलिसांना आरोपींचा माग काढता आला. या प्रकरणात अर्जुन उत्तम कनकापुरे (३२, रा. ब्राम्हणगाव, ता. उमरखेड) यास अटक करण्यात आली. चौकशीत त्याने चोरीचा मोबाईल व दागिने साथीदार अरिहंत उर्फ संतोष दत्तात्रय कस्तुरे (४२, रा. ब्राम्हणगाव, ता. उमरखेड) याला दिल्याचे सांगितले. त्यालाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता उमरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण चार घरफोड्यांचे गुन्हे केल्याचे कबूल केले. त्यातून ९ मोबाईल, सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा २.८३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

ही यशस्वी कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक मा.कुमार चिंता, अप्पर अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमान गायकवाड, पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ, पोलीस निरीक्षक यशोथरा मुनेश्वर तसेच सायबर सेल यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत डिबी प्रमुख पोउपनि सागर इंगळे, पोहेका मधुकर पवार, पोशि संघशील टेंभरे, चालक पोशि सुनिल ढोंबरे, पोशि महारुद्र, डिबी टिम पो.स्टे. उमरखेड यांनी योगदान दिले. तसेच सायबर सेल यवतमाळचे मपोशि पुजा भारस्कर, पोशि सचिन देवकर यांनी महत्वाची भूमिका बजावली.सदर गुन्ह्माचा पुढील तपास पोउपनि सागर इंगळे, पोलीस स्टेशन उमरखेड करीत आहेत.