मनसे गरबा महोत्सवा’त हर्षल इखारे ठरला दुचाकी गाडीचा मानकरी

October 3, 2025

वणी :महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वणी विधानसभा मतदारसंघ आयोजित ‘भव्य मनसे गरबा महोत्सवा’चा बक्षीस वितरण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात आणि थाटात पार पडला. मनसे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून गेल्या अनेक वर्षांपासून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या या महोत्सवाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाची सांगता बक्षीस वितरणाने झाली. १२ ते ३० या वयोगटात हर्षल इखारे याने प्रथम क्रमांक पटकावत दुचाकी गाडीचे भव्य बक्षीस जिंकले.

◾अंतिम फेरीत स्पर्धकांची ‘काटे की टक्कर’
गरबा महोत्सवाच्या अंतिम राऊंडमध्ये खरंच ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळाली. शेवटचा दिवस असल्याने सर्व स्पर्धकांनी आपल्या सादरीकरणाची पातळी उंचावली होती. प्रत्येक सहभागीने अतिशय जोरदार सादरीकरण, पारंपरिक आणि आकर्षक वेशभूषा आणि अप्रतिम उत्साह दाखवत परीक्षकांना चकित केले. प्रत्येकजण विजेतेपदासाठी जीवाचे रान करत होता, ज्यामुळे सोहळ्याची रंगत अधिकच वाढली आणि अंतिम निकाल जाहीर होईपर्यंत मैदानातील उत्कंठा शिगेला पोहोचली होती.
विविध वयोगटातील विजेत्यांचा गौरव
मनसे नेते राजू उंबरकर यांची कन्या मुक्ता उंबरकर हिच्यासह इतर मान्यवरांच्या शुभहस्ते सर्व विजेत्यांना पारितोषिक देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. यावेळी मनसेचे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या गरबा महोत्सवात एकूण तीन वयोगटात बक्षीस वितरण करण्यात आले, ज्यात मौल्यवान बक्षिसांची खैरात करण्यात आली.

▪️ विजेते स्पर्धक
५ ते ११ वयोगट: प्रथम पारितोषिक (सायकल): समन्विता ठाकरे, द्वितीय क्रमांक: अमायरा पेटकर,तृतीय क्रमांक: अरशिद जयस्वाल
१२ ते ३० वयोगट (या गटात एकूण दहा बक्षिसे देण्यात आली): प्रथम क्रमांक (दुचाकी गाडी): हर्षल इखारे द्वितीय क्रमांक (लॅपटॉप): रिशिका चव्हाण, तृतीय क्रमांक (फ्रिज): प्राची डुकरे,चतुर्थ क्रमांक (वॉशिंग मशीन): प्रतिक्षा बेलेकर पाचवा क्रमांक (एल.सी.डी): माही ठाकूर इतर ५ मौल्यवान बक्षिसे
३० आणि त्यावरील वयोगट: प्रथम पारितोषिक (सोन्याची नथ): सोनिया भादेकर, द्वितीय क्रमांक (ओव्हन): अर्चना मंदावार, तृतीय क्रमांक (ज्यूसर): प्रिया आवारी, व्याक्युम क्लिनर: मित्तल खोब्रागडे, पैठणी साडी: रश्मी कोसे यासोबतच अनेक स्पर्धकांना प्रोत्साहन बक्षिसे म्हणूनही मौल्यवान वस्तू देण्यात आल्या.
या महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद अविस्मरणीय होता. आयोजकांनी हा भव्य महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या सर्व सहकारी, हितचिंतक आणि स्पर्धकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. प्रशिक्षक म्हणून जतिन राऊत, वैभव पुराणकर, जयशंकर खुराणा, राणी हांडे तर स्पर्धेचे परीक्षक म्हणून मनिषा बुरांडे व खुशबू वैरागडे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.
बक्षीस वितरण सोहळ्याला मनसे महिला सेनेच्या राज्य उपाध्यक्ष अलका टेकाम, मनसे वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान, माजी आरोग्य सभापती धनंजय त्रिंबके, रुग्ण सेवा केंद्र अध्यक्ष अनिस सलाट, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष रमेश पेचे, महिला जिल्हाध्यक्ष अर्चना बोदाडकर, गरबा महोत्सव अध्यक्ष साहिल सलाट, शहराध्यक्ष अंकुश बोढे, राकेश वैद्य, गोविंदराव थेरे, विलन बोदाडकर, परशुराम खंडाळकर, लक्की सोमकुंवर, रोहन उंबरकर, मयुर गेडाम, मयुर घाटोळे, शंकर पिंपळकर, गौरव पुराणकर, संस्कार तेलतुंबडे, हिरा गोहोकार, योगेश तुराणकर, योगेश ताडम, तालिब खान, सचिन कुडमेथे, कृष्णा नीमसटकर, कृष्णा कुकडेजा, संदीप ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.