टोलेबाज वार्ता पत्र : रवि घुमे : मारेगाव
वणी : येथील घोंसा रोडवर रविवार ता.५ ऑक्टोबर च्या रात्री ८.२५ वाजताचे सुमारास सुनील उत्तमराव गेडाम (४५)हे घोंसा रोडवर त्यांचे घरासमोर एका मित्रासोबत बोलत असताना तिथे तुषार संजय पवार व त्याचे वडील संजय कन्हैया पवार यांच्यात वाद सुरू झाला.
वाद सुरु असताना फिर्यादी सुनीलने तुम्ही महिलांसमोर वाद का घालत आहात असा प्रश्न उपस्थित केला असता तुषार ने त्याला थापडबुक्याने मारहाण केली तसेच अश्लील व जातिवाचक शिवीगाळ केली अशी तक्रार फिर्यादीने पोलीस स्टेशन मारेगावला दिली. या घटनेने सुनील व सुनीलच्या परिवारामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
फिर्यादी सुनील गेडाम यांच्या तक्रारीवरून मारेगाव पोलिसांनी आरोपी तुषार संजय पवार आणि संजय कन्हैया पवार यांच्यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 च्या कलम 3(1)(r), 3(1)(s), 3(2)(va) आणि भारतीय न्याय संहिता (बी एन एस)2023 चा कलम 115(2), 296 3(5), 351(2), 351(3) नुसार गुन्हा दाखल केला असून मारेगाव पोलीस पुढील तपास करत आहे.













