स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची ‘महागावात ‘ धडक कारवाई

October 7, 2025

वणी : मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री कुमार चिंता यांच्या आदेशाने जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैद्य धंदे, अवैद्य शस्त्र पुरवठा,अउघड गुन्हे, आरोपी शोध मोहीम, अवैद्य धंद्याच्या मुळासकट नाश करण्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेश पारित करून पथकाला गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

महागांव हद्दीतील करजखेड येथे पुलाचे काम सुरू असता पुलाच्या बांधकामाचे लोखंडी भीम चोरी झाल्याची तक्रार महागाव पोलीस स्टेशन येथे अप.क्रमांक497/2025 कलम303(2) भान्यास प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

दि. 7ऑक्टोबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद व उमरखेड उपविभागात पेट्रोलिंग करीत असता पथकाला महागाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोपनीय माहितीच्या आधरे करजखेड पुलाच्या बांधकावरील लोखंडी भीम चोरटे जनुना फाटा येथे असल्याची माहिती मिळाली . तसेच पथकाने ताबडतोब त्यांच्या मागावर जाऊन दोन्ही इसमास जणूना फाटा येथून स्प्लेंडर प्लस मोटरसायकलसह क्र.MH-29BU-3475 च्या ताब्यात घेतले .

पथकाने त्यांना कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल करून पुलाच्या बांधकामावरील साहित्य आरोपी 1) विशाल दिलीप इंगोले 2) राम विठ्ठल दवणे 3) अक्षय उर्फ बदक्या दीपक खिल्लारे असे आम्ही तीनही मिळून मोटर सायकल क्र. MH29BU3475 ने पुलाचे लोखंडी बीम राजकुमार नरवाडे जुनूना यांच्या शेततळ्यात लपविल्याचे कबूल केले.

सदर चोरीचा माल पंचासमक्ष राजकुमार नरवाडे जुनूना यांच्या शेततळ्यातून बांधकामाचे 20 फूट लांबीचे 3 लोखंडी भीम अंदाजे कि. ₹18000 हजार व मोटर सायकल अंदाजे किं.₹60,000 हजारअसा एकूण ₹78,000 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री कुमार चिंता, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात, मा. विभागीय पोलीस अधिकारी श्री हनुमंत गायकवाड,स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सतीश चौरे,सपोनि धीरज बांडे, पोउनि शरद लोहोकरे, मुन्ना आडे, संतोष भोरगे, तेजाब रणखांब, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, सुनील पंडागळे, राजेश जाधव, चापोउपनि. रवींद्र श्रीरामे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. पुढील तपास महागाव पोलीस करीत आहे.