अनुदानित आदिवासी आश्रम शाळा सावरखेड येथे बिरसामुंडा जयंती साजरी

October 11, 2025

वणी : सावरखेड,तालुका राळेगाव येथील अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा येथे क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती साजरी करण्यात आली.

यांच्या १५० व्या जयंती निमित्त राष्ट्रीय जनजाती गौरव वर्ष अभियाना अंतर्गत आज दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी येथे आदिवासी क्रांतीवीराची ओळख यामध्ये गोंडवाना क्रांतीवीर नारायन सिंग उईके यांच्यावर व्याख्यान आयोजित केले होते. प्रमुख वक्ते श्री. पवन आडे सर यांनी क्रांतिवीर नारायण उईके यांचा जीवन परिचय दिला. नारायण उईके यांचा जन्म ११ जुलै १९१७ ला झाला. १९५२ ला ते आमदार म्हणून निवडून आले त्या काळात त्यांचे सामाजिक व राजकीय कार्य फार महत्वाचे राहिले. आदिवासिंच्या हक्कासाठी त्यांनी ६ डिसेंबर १९६० ला नागपूर विधानसभेवर ६० हजार लोकांसह अभूतपूर्व मोर्चा काढला. त्यांनी स्वतंत्र गोंडवाना राज्याची मागणी केली. नारायण सिंग उईके यांनी गरीब तसेच मागासलेल्यांच्या अधिकाराच्या रक्षणासाठी समर्थपणे लढा दिला व संपूर्ण जीवन आदिवासीसाठी समर्पित केले. अशाप्रकारे आडे सरांनी नारायण सिंघ उईके यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकला.

निबंध स्पर्धेचे आयोजन
सावरखेड आश्रम शाळेमध्ये “आदिवासी क्रांतिकारकांचा गौरवशाली इतिहास व आदर्श संस्कृती “
यावर आधारित निबंध स्पर्धेचे आयोजन केले, यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष ए.सी. झलके सर होते तर प्रा.अमर कोंडापलकूलवार व प्राथमिक चे सुपारे सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. आडेकर सर प्रा.येडमे सर, प्रा. कोट्टागिरीवार सर, प्रा. बुरखंडे सर व प्रा.नक्षणे ( घुमे )मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गजानन खोले सर यांनी केले, प्रास्ताविक श्री येडमे सर यांनी केले
आभार प्रदर्शन प्रा. खर्चे (चोपडे) मॅडम यांनी केले.
कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
सर्व कर्मचाऱ्यांच्या सहयोगाने कार्यक्रम यशस्वी झाल्याचे समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते.