टोलेबाज न्यूज :अभय गावंडे, यवतमाळ
वणी : यवतमाळ धामणगाव रोडवरील करळगाव गावातील ७ ऑक्टोबर २०२५ चे अंदाजे दुपारी २वा.गावरान धाबा येथे येऊन भेट झाली व आम्ही बेंबळा वेली शेतकरी उत्पादन कंपनी अशा ट्रेडिंग कंपनीच्या नावाने काम करतो असे सांगून एकूण 0८करोड ६३लाख रुपयाची फसवणूक केली.
सविस्तर वृत्तअसे यातील आरोपी १)कानाराम भगतराम जाट वय २६ रा. धनारी खुर्द जोधपूर २)रवींद्र पुनिया वय २५ रा. बर्निया जोधपुर राजस्थान ३)करमवीर सिंग वय २५रा. राजस्थान ४) श्रावणपूर्ण रा.राजस्थान यांनी संगणमत करुन गावरान धावा करळगाव येथे येवून फिर्यादी सोबत चर्चा करून आम्ह ट्रेंडींग कंपनीत काम करीत असल्याचे सांगुन बेंबळा व्हेली शेतकरी उत्पादक कंपनीशी तुमचा करार करून देतो तसेच आमची कंपनी तुम्हाला वेगवेळया सुवीधा पुरवुन तुम्हाला सिमकार्ड तसेच व्यवहाराकरीता 50 लाख रुपये देईल असे सांगुन इतरांकडुन बँकखातेचे कागदपत्रे, आधारकार्ड, पॅनकार्ड, इंटनेट बँकिंगची सेवा सुरु करुन देवून तीन महीन्यानंतर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होईल असे सांगितले नंतर फिर्यादी व ईतर लोकांच्या बँक खात्यामधुन वेगवेगळया गेमींग अॅप वरुन एकुण 08 करोड 63 लाख रु. रक्कम परस्पर वळती करुन फसवणुक केली.अशी टिकाराम उकडराव राठोड वय ५५ वर्ष बाणगाव ता. नेर जिं. यवतमाळ यांच्या फिर्यादी जबानी रिपोर्ट वरून दि. १०ऑक्टोबर२०२५ चा रात्री अंदाजे १०वा. ४७५/२५ कलम ३१८(४), ३(५)भान्यास सदरचा गुन्हा नोंदकरून पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहे.













